सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. या दिवसात पूजाअर्चा करताना आपण घरातील चांदीच्या मटेरियलपासून बनवलेल्या देव-देवतांच्या मूर्तींचे पूजन करतो. परंतु वर्षभर या मूर्ती बहुतेकवेळा (how to clean silver pooja utensils at home) कपाटातच ठेवलेल्या असतात. वर्षभर वापरात नसल्याने किंवा हवेच्या संपर्कात आल्याने ते काळवंडतात आणि त्यांची चमक कमी होते. दसरा, दिवाळी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर देवघरातील या मूर्ती चकाचक आणि स्वच्छ (easy way to clean silver pooja items) दिसणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत, आयत्यावेळी या चांदीच्या मूर्ती नेमक्या कशा स्वच्छ कराव्यात असा प्रश्न पडतो(natural methods to clean silver idols).
या काळवंडलेल्या चांदीच्या मूर्त्यांना पुन्हा नव्यासारखे चमकदार बनवण्यासाठी बाजारात अनेक महागडे उपाय आणि पॉलिशचा पर्याय उपलब्ध आहे, पण ते वापरणे नेहमीच शक्य होतेच असे नाही. अशावेळी महागडे केमिकल्स न वापरता काही सोप्या घरगुती उपायांनी देखील चांदीच्या मूर्ती पुन्हा एकदा नव्यासारख्या स्वच्छ, लखलखीत आणि चमकदार करता येतात. कमी वेळेत आणि कमी खर्चात चांदीच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या, त्यांची पूर्वीची चमक कशी परत आणायची याबद्दलची ही सोपी घरगुती 'ट्रिक' पाहूयात. या एका घरगुती सोप्या ट्रिकच्या वापरामुळे तुमच्या चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती क्षणार्धात नव्यासारख्या लख्ख चमकू लागतील.
चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती नव्यासारख्या लख्ख चमकविण्यासाठी खास उपाय...
नेहमीच्या वापरात नसलेल्या चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती शक्यतो काळवंडतात, अशावेळी त्या मुर्त्या घरच्याघरीच स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक momandthebeauty या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतीही टूथपावडर किंवा टूथपेस्ट, लिंबाचा रस आणि पाणी इतक्या गोष्टींची गरज लागणार आहे.
एक बाऊलमध्ये, टूथपावडर किंवा टूथपेस्ट घेऊन त्यात २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. मग हे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर छोट्या पेंटब्रशच्या मदतीने ही तयार पेस्ट चांदीच्या मूर्त्यांना लावून घ्यावी. मग, १० ते १५ मिनिटे ही पेस्ट त्या मुर्त्यांवर तशीच राहू द्यावी. मग एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने मुर्त्या हलकेच घासून स्वच्छ करुन घ्याव्यात. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मुर्त्या धुवून घ्याव्यात. मुर्त्या स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्याव्यात.
गॅस शेगडी दिसेल नव्यासारखी लख्ख! ४ टिप्स - न घासताच चिकट - तेलकट डाग निघतील सहज...
भांडी घासताना कपडे होतात ओलेचिंब? ६ ट्रिक्स - कपडे न भिजता- भांडी चकाचक करा झटपट...
चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्याच्या इतरही ट्रिक...
१. बेकिंग सोडा आणि पाणी :- बेकिंग सोड्यात थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि त्याने चांदीच्या मुर्त्या किंवा वस्तू घासून स्वच्छ करा.
२. लिंबू व मीठ :- लिंबाचा रस काढून त्यात थोडं मीठ घाला आणि चांदीच्या वस्तूवर हलक्या हाताने चोळा.
३. टूथपेस्ट :- पांढरी टूथपेस्ट (जेल नसलेली) चांदीवर लावून मऊ कपड्याने घासल्यास काळवंडलेपणा निघतो.
४. ॲल्युमिनियम फॉइल व गरम पाणी :- एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल टाका, त्यात गरम पाणी, थोडं मीठ व बेकिंग सोडा घालून चांदीची वस्तू काही मिनिटं बुडवून ठेवा. हे इतर उपायही आहेत फायदेशीर.