lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक

इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक

Cleaning Hacks: अशी अडचण बऱ्याचदा येते आणि इस्त्रीचा बेस खराब (stains on the surface of press) होऊ लागतो. त्यासाठीच तर डाग कमी असतानाच हे काही उपाय करा. म्हणजे मग इस्त्री जास्त खराब होणार नाही. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 01:57 PM2022-08-01T13:57:19+5:302022-08-01T13:58:03+5:30

Cleaning Hacks: अशी अडचण बऱ्याचदा येते आणि इस्त्रीचा बेस खराब (stains on the surface of press) होऊ लागतो. त्यासाठीच तर डाग कमी असतानाच हे काही उपाय करा. म्हणजे मग इस्त्री जास्त खराब होणार नाही. 

How to clean rust on press? How to clean the stains of burnt clothes on the surface of press  | इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक

इस्त्रीला गंज चढलाय किंवा कपडे जळाल्याचा डाग पडलाय? ३ उपाय, डाग गायब- इस्त्री चकाचक

Highlightsकपडा जळाल्याचे डाग किंवा मग इस्त्रीला चढलेला गंज, असे दोन्हीही डाग काढायचे असतील, तर हे काही घरगुती उपाय करून बघा. 

इस्त्रीचा खूप वापर नसेल तर पावसाळी दमट वातावरणात इस्त्रीवर थोडा थोडा गंज (rust on press) चढू लागतो. सुरुवातीला अगदी एखाद्या थेंबाप्रमाणे असणारे हे डाग हळूहळू वाढत जातात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर इस्त्री खराब होण्याचा धाेका असतो. किंवा बऱ्याचदा असंही होतं की घरी नायलॉन, पॉलिस्टर अशा कपड्यांना इस्त्री (iroing clothes) करत असताना कपडा जळतो आणि त्याचा चॉकलेटी, तपकिरी रंगाचा डाग इस्त्रीवर तसाच राहतो. या डागामुळे मग इतर कपडेही खराब होण्याचा धोका असतो. म्हणूनच कपडा जळाल्याचे डाग किंवा मग इस्त्रीला चढलेला गंज, असे दोन्हीही डाग (How to clean rust on press) काढायचे असतील, तर हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा. 

 

इस्त्रीला पडलेले डाग काढण्यासाठी...
१. बेकींग सोडा आणि लिंबू

एखादा टेबलस्पून बेकींग सोडा एका वाटीत घ्या. त्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाका. थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट इस्त्रीवर पडलेल्या डागावर लावा. एखादा मिनिट तशीच राहू द्या. त्यानंतर त्यावर लिंबाचं साल घासा किंवा प्लॅस्टिकच्या घासणीने हळूवार घासा. डाग स्वच्छ होईल. यानंतर स्वच्छ पाण्याने इस्त्री चांगली पुसून घ्या.

 

२. पॅरासेटीमॉल गोळ्या
घरात जर पॅरासेटीमॉलच्या एक्स्पायरी डेट झालेल्या गोळ्या असतील तर त्याचा उपयोग तुम्ही इस्त्री स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हा उपाय करण्यासाठी इस्त्री सुरू करून थोडी कोमट करून घ्या. त्यानंतर ती बंद करा. आता कोमट इस्त्रीवर पॅरासेटीमॉलची गोळी घासा. थोडंसं घासल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. इस्त्री थंड झाली की पुन्हा ती कोमट करा आणि पुन्हा त्यावर गोळी घासा आणि पुसून घ्या. डाग निघेपर्यंत हा उपाय करत रहा. 

 

३. सॅण्डपेपर
सॅण्ड पेपरचा वापर करूनही इस्त्रीवरचे गंजाचे किंवा जळालेले डाग चटकन काढता येतात. हा उपाय करण्यासाठी इस्त्रीवर थोडं पाणी शिंपडून तो डाग ओलसर करून घ्या. आता या ओलसर डागावर सॅण्डपेपर घासा. सॅण्डपेपर खूप जोरजोरात घासू नये. हळूवारपणे घासा. सॅण्डपेपर घासताना इस्त्रीचा बेस कोरडा झाला तर पुन्हा त्यावर पाणी शिंपडा आणि पुन्हा घासा.

 

४. चुना आणि मीठ
चुना आणि मीठ समप्रमाणात एकत्र घ्या. ते व्यवस्थित कालवून इस्त्रीवर जिथे डाग पडले आहेत, अशा ठिकाणी लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाणी शिंपडून हा भाग थोडा ओलसर करून घ्या आणि एखाद्या कपड्याने डाग घासून स्वच्छ करा. 
 

Web Title: How to clean rust on press? How to clean the stains of burnt clothes on the surface of press 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.