Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुकरवर तेल-मसाल्यांचे काळे-पिवळे डाग? कुकरचे झाकण १५ दिवसांनी 'असं' करा साफ; कुकर दिसेल नव्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 15:00 IST

Maintenance tips for pressure cooker safety: How to clean cooker vent tube and whistle: महागडा कुकर वर्षानुवर्षे नव्यासारखा चकाचक ठेवायचा असेल आणि सुरक्षितपणे स्वयंपाक करायचा असेल, तर दर १५ दिवसांनी 'या' दोन गोष्टी करणे गरजेचे आहे.

स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा कुकर हा आपला वेळ आणि इंधन दोघांचीही बचत करतो. डाळ असो वा भात कुकरशिवाय आपले काम पूर्ण होत नाही. घाईच्या वेळीत कुकरमध्ये डाळ-भात किंवा बटाटे एकाच वेळी लावता येतात ज्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होते.(Maintenance tips for pressure cooker safety) पण रोजच्या वापरामुले कुकरच्या झाकणावर तेल, मसाले आणि अन्नाचे काळे-पिवळे डाग साचू लागतात. अनेकदा कुकरमधील पाणी बाहेर आल्यामुळे शिट्टीच्या आसपास हट्टी थर तयार होतो, जो साध्या साबणानेही निघत नाही. यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. (How to clean cooker vent tube and whistle)कुकरचे झाकण, शिट्टी व्यवस्थित साफ केली नाही तर वाफ जाण्याचा मार्ग बंद होतो ज्यामुळे कुकरचा स्फोट होण्याची भीती असते.(Best ways to remove grease from cooker lid) आपण बाहेरून कुकर चकाचक करतो, पण खरी घाण त्याच्या आतील भागात आणि व्हेंट ट्यूबमध्ये दडलेली असते. जर तुम्हाला तुमचा महागडा कुकर वर्षानुवर्षे नव्यासारखा चकाचक ठेवायचा असेल आणि सुरक्षितपणे स्वयंपाक करायचा असेल, तर दर १५ दिवसांनी 'या' दोन गोष्टी करणे गरजेचे आहे. पाहूया कुकर स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स 

पैसा-प्रेम-प्रतिष्ठा हवी तर स्वत:ला लावा १० सवयी, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल कायम

1. कुकरचे झाकण खराब होण्याचे कारण म्हणजे शिट्टीच्या नळीमध्ये अन्नाचे कण अडकणे. यासाठी झाकणाची शिट्टी काढून टाका. एक लांब तार किंवा टूथपिक घेऊन ती व्हेंट ट्यूबमध्ये घालून त्यात अडकलेला कचरा बाहेर काढा. यामुळे वाफ अडकणार नाही आणि कुकरची शिट्टी व्यवस्थित होईल.अनेकदा पदार्थ अडकल्यानंतर क्लिनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गरम पाण्यात लिंबू आणि खाण्याचा सोडा टाकून झाकण ५ मिनिटे बुडवून ठेवल्यास शिट्टीच्या भोवतालचे डाग सहज निघतात. 

2. कुकरच्या रबरमध्ये तेलाचे अंश साचल्यामुळे ते सैल किंवा कडक होते, ज्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर गळू लागते. गॅसकेट काढून त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला. ५ मिनिटांनी जुन्या टुथब्रशने ते घासून घ्या. झाकणावरील काळे डाग काढण्यासाठी लिंबाची साल आणि मीठ वापरून स्क्रब करा.

3. कुकर स्वच्छ झाल्यानंतर शिट्टीमध्ये १ ते २ थेंब तेल घाला. यामुळे शिट्टीला गंज लागत नाही आणि शिट्ट्या व्यवस्थित होतात. दर १५ दिवसांनी हे काम केल्यास कुकर लवकर खराब होणार नाही. 

4. कुकरमध्ये अन्न शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. जास्त पाणी झाल्यामुळे ते शिट्टीवाटे बाहेर येते आणि झाकण घाण होते. घाईघाईत शिट्टी उचलून वाफ काढू नका. यामुळे झाकणाच्या आतील बाजूला अन्नाचे थर चिकटून राहतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean your cooker every 15 days for a sparkling, safe kitchen.

Web Summary : Pressure cookers save time and fuel but accumulate stains. Clean the vent tube, whistle, and rubber gasket regularly with baking soda, vinegar, or lemon to prevent explosions and maintain hygiene. Proper cleaning ensures cooker longevity.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी