केस व्यवस्थित लावण्यासाठी किंवा मोकळे करण्यासाठी बदलत्या काळानुसार आता प्लास्टिकसोबतच लाकडी कंगव्यांचा देखील वापर केला जातो. पण रोज कंगव्याचा वापर केल्यानं त्यातील दात्यांमध्ये धूळ-माती, केस, लेत, कोंडा आणि बॅक्टेरिया जमा होतात.
तेल, तुटलेले केस, धूळ यामुळे कंगवा खराबही होतो आणि दिसायलाही घाण दिसतो. बरेच लोक हातपीन घेऊन एक एक दाता साफ करत बसतात. ज्यात खूप वेळ जातो. अशात तुम्ही केवळ ५ रूपयांचं एक मिश्रण तयार करून कंगवा साफ आणि आधीसारखा नवा करू शकता.
कंगवा साफ करण्यासाठी तुम्हाला ३ गोष्टींची गरज आहे. यासाठी एक चमचा व्हिनेगर, एक चमचा बेकिंग सोडा आणि कोमट पाणी लागेल. प्लास्टिक असो वा लाकडी कंगवे साफ करण्यासाठी एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाका.
आता कंगवा २० मिनिटांसाठी मिश्रणात टाकून ठेवा. नंतर टूथब्रशनं हलक्या हातानं घासत कंगव्याच्या दातांची सफाई करा. नंतर कंगवा पाण्यानं धुवा.
टूथपेस्ट
कंगवे साफ करण्यासाठी टूथपेस्टही कामात येऊ शकतं. यासाठी एका वाटीमध्ये पाणी टाकून टूथपेस्ट टाका. ही पेस्ट कंगव्यावर लावून १० मिनिटांसाठी तशीच ठेवा. नंतर कंगवा ब्रश घासा.
लिंबू आणि मीठ
किचनमध्ये ठेवलेलं मीठ आणि लिंबू सुद्धा कंगव्याची सफाई करतं. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मीठ टाका, आता लिंबाला मीठ लावून कंगव्यावर घासा. अशाप्रकारे कंगव्यावरील डाग, धूळ-माती दूर करू शकता.