मिक्सर ही स्वयंपाक घरातील अतिशय महत्वाची वस्तू. मिक्सर फिरवला की अगदी मिनिटभरात पेस्ट, वाटण सगळंच झटपट तयार. मिक्सरचा वापर आपण रोजच्या रोज तर करतोच. रोज काही ना काही पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर त्यावर बरेचदा मसाल्यांचे डाग पडतात. मिक्सरवर मसाल्यांचे डाग पडले असता ते (How to Clean Mixing/blending Jars in 1 minute) स्वच्छ करणे देखील तितकेच महत्वाचे असते. रोज स्वयंपाकात वापरत असलेल्या मिक्सरच्या भांड्याची साफसफाई करताना त्याच्या खालच्या बाजूला म्हणजेच ब्लेडच्या कडांजवळ अन्नाचे उरलेले कण, मसाले किंवा पेस्ट काहीवेळा चिकटून राहते(Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like ‘new’).
या भागात असलेल्या मिक्सरच्या ब्लेडमुळे तो व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही. अनेकदा पाणी घालून धुतले तरी ती जागा नीट स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. या भागात घाण साचल्याने भांडे वास येऊ लागते किंवा खराबही होऊ शकते. यासाठीच, असे मिक्सरचे भांडे वेळीच स्वच्छ केले नाही तर ते भांड खूप जुनाट दिसू लागत. याचबरोबर त्या मिक्सरच्या खालच्या भागात काळपट - मेणचट थर साचून राहतो, ज्यामुळे मिक्सर वेगानं फिरत नाही. अशावेळी आपण एक साधीसोपी ट्रिक वापरुन खराब झालेल्या मिक्सरच्या खालचा भाग अतिशय झटपट स्वच्छ करु शकतो.
मिक्सरच्या खालचा भाग स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक...
लागणारे साहित्य :-
१. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून २. व्हिनेगर - २ टेबलस्पून ३. डिश वॉश लिक्विड सोप - १ टेबलस्पून ४. मीठ - १ टेबलस्पून
किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...
घरभर उंदरांचा उच्छाद? करा कणकेच्या पिठाचा सोपा घरगुती उपाय - उंदीर पळतील घराबाहेर...
आता करायच काय ?
सगळ्यात आधी मिक्सरचे भांडे उलटे धरून त्यात, प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा, व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड सोप, मीठ असे सगळे पदार्थ घालावेत. त्यानंतर, जुन्या टूथब्रशच्या मदतीने आपण हे भांड स्वच्छ घासून घ्यावे. मग हे भांडं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर कोणत्याही डिशवॉश लिक्विड सोपच्या मदतीने हे भांड पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने भांड धुवून घ्यावे. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून आपण मिक्सरच्या खालच्या भागातील कठीणातले कठीण हट्टी, चिकट, मेणचट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.
पावसाळ्यात डास - चिलटं - माशांचा भणभणाट? पाहा लसणाचा असरदार उपाय- घर पावसाळ्यातही वाटेल फ्रेश...