Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी चिकट थर, ब्लेड नीट फिरत नाही? २ ट्रिक्स - भांडं होईल स्वच्छ फिरेल गरागरा...

मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी चिकट थर, ब्लेड नीट फिरत नाही? २ ट्रिक्स - भांडं होईल स्वच्छ फिरेल गरागरा...

how to clean mixer grinder bottom : how to clean mixing blending jars in 1 minute : mixer grinder cleaning hacks : brilliant hacks to clean mixer grinder : मिक्सरच्या भांड्याच्या पृष्ठभागाची स्वच्छता नीट करता येत नाही, वापरा एक खास घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 12:30 IST2025-09-24T12:15:44+5:302025-09-24T12:30:10+5:30

how to clean mixer grinder bottom : how to clean mixing blending jars in 1 minute : mixer grinder cleaning hacks : brilliant hacks to clean mixer grinder : मिक्सरच्या भांड्याच्या पृष्ठभागाची स्वच्छता नीट करता येत नाही, वापरा एक खास घरगुती उपाय...

how to clean mixer grinder bottom how to clean mixing blending jars in 1 minute mixer grinder cleaning hacks brilliant hacks to clean mixer grinder | मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी चिकट थर, ब्लेड नीट फिरत नाही? २ ट्रिक्स - भांडं होईल स्वच्छ फिरेल गरागरा...

मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी चिकट थर, ब्लेड नीट फिरत नाही? २ ट्रिक्स - भांडं होईल स्वच्छ फिरेल गरागरा...

आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या उपकरणांपैकी एक म्हणजे मिक्सर. रोजच्या वापरात कोणत्याही पदार्थाची बारीक पूड किंवा पेस्ट करायची म्हटलं तर आपण मिक्सरचा वापर करतोच. मिक्सरचे भांडं (how to clean mixing blending jars in 1 minute) रोज वापरले जाते, सततच्या वापराने हे भांडं खराब होते. मिक्सरचे भांडं आपण रोज धुवून - पुसून स्वच्छ करतो, परंतु मिक्सरच्या भांड्याचा तळाचा पृष्ठभाग स्वच्छ करणे म्हणजे थोडे कठीण काम. या भांड्याच्या तळाशी ब्लेडचे पात असल्याने ते व्यवस्थित स्वच्छ (how to clean mixer grinder bottom) करता येत नाही. या भांड्याच्या तळाशी घाण (mixer grinder cleaning hacks) साचून राहते, परिणामी काहीवेळा बुरशी येते तर कधी चिकट थर साचून राहतो. अनेकदा या भागात पाणी घालून धुतले तरी स्वच्छ करता येत नाही यामुळे त्या जागी बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते(brilliant hacks to clean mixer grinder).

मिक्सरच्या भांड्यात अशाप्रक्रारे घाण साचून राहिल्यास कुबट दुर्गंधी देखील येऊ लागते. यासाठी, असे मिक्सरचे भांडं वेळीच स्वच्छ केलं नाही तर तर भांडं जुनाट दिसू लागत. याचबरोबर, मिक्सरच्या भांड्याच्या खालच्या भागात काळपट - मेणचट थर साचून राहतो ज्यामुळे मिक्सर वेगाने फिरतही नाही. अशावेळी आपण एक साधीसोपी ट्रिक वापरुन खराब झालेल्या मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग अगदी मिनिटभरात स्वच्छ करु शकतो. या एका खास घरगुती ट्रिकमुळे मिक्सरचं भांडं अगदी सहज स्वच्छ होऊन नव्यासारखे  चमकदार करता येतं. 

मिक्सरच्या भांड्याचा पृष्ठभाग स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी काळपट - चिकट मेणचट थर साचतो तो स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक prajakta_salve_official या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. भांडं स्वच्छ करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून बेकिंग सोडा किंवा इनो, १ कप कोणतेही कोल्डड्रिंक आणि १ जुना टूथब्रश इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

आता नेमकं करायच काय ? 

सगळ्यांत आधी मिक्सरचे भांडे उलटे करुन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घाला. त्यानंतर त्यावर हळूहळू कोणतेही कोल्ड्रिंक ओता. मग जुन्या टूथब्रशच्या मदतीने आतील घाण व चिकट मेणचट थर घासून काढून घ्या. मग १५ ते २० मिनिटे हे मिश्रण त्यात तसेच राहू द्यावे. त्यानंतर हे मिश्रण ओतून पुन्हा नेहमीप्रमाणे लिक्विड डिश वॉश किंवा साबणाच्या मदतीने हे भांडं स्वच्छ घासून घ्यावे. त्यानंतर पाण्याने भांडं स्वच्छ धुवा. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरुन आपण मिक्सरच्या भांड्याच्या पुष्ठभागावरील हट्टी काळे डाग व चिकट थर सहज काढू शकतो. 

घरातील उंदीर जातील पळून! कांदा, चमचाभर बेसन आणि माचिसच्या काड्यांचा देसी उपाय - उंदीर दिसणारच नाहीत... 


अर्धा चिरलेला लिंबूही राहील जास्त दिवस ताजा! ५ भन्नाट ट्रिक्स - आठवडाभरानंतरही मिळेल भरपूर रस... 

मिक्सरच्या भांड्याच्या पृष्ठभागावरील चिकट थरामुळे मिक्सर फिरत नाही... 

मिक्सरच्या भांड्याच्या पृष्ठभागावर चिकट - काळपट थर साचल्यामुळे मिक्सरच पात व्यवस्थित फिरत नाही. जर या भांड्यातील ब्लेड नीट फिरत नसतील तर त्यातील पदार्थ हवे तसे बारीक करता येत नाहीत, आपल्यापैकी प्रत्येक गृहिणीला हा अनुभव आलाच असेल. यासाठी मिक्सरच्या भांड्यातीळ ब्लेडच्या बरोबर मध्यभागी खोबरेल तेल बोटाने लावून व्यवस्थित पसरवून घ्यावे. याचबरोबर, बाहेरील बाजूने ब्लेडच्या मध्यभागी पेट्रोलियम जेली लावावी. त्यानंतर गॅसच्या मंद आचेवर हे भांडं उलटं ठेवून काही सेकंद हलकंसं गरम करून घ्यावं. मग आपण पाहू शकता की ब्लेड झटपट व्यवस्थित गोल फिरायला लागतील.

इडली - डोशाचं पीठ जास्त आंबलं,फेकून देण्याआधी वाचा ८ फायदे!  घराच्या स्वच्छतेसाठीही उपयोगी...


Web Title: how to clean mixer grinder bottom how to clean mixing blending jars in 1 minute mixer grinder cleaning hacks brilliant hacks to clean mixer grinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.