Join us

फ्रिजमध्ये साचलेले टोमॅटो केचअपचे सॅशे करतील किचन सिंक स्वच्छ! गणेशोत्सवापूर्वी करा ‘हा’ भन्नाट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 13:29 IST

how to clean kitchen sink with tomato sauce : tomato sauce cleaning hack for sink : clean stainless steel sink with tomato sauce : remove stains from sink using tomato sauce : natural kitchen sink cleaning hacks : tomato ketchup hack for cleaning sink : फ्रिजमध्ये महिनोंमहिने पडून असलेल्या टोमॅटो केचअपचे सॅशेज करतील तुमचे किचन सिंक नव्यासारखे लख्ख...

आता अवघ्या काही दिवसांतच गौरी - गणपतीचे आगमन होणार आहे. खास सणावारानिमित्ताने आपण सगळेच घराच्या कानाकोपऱ्यांची स्वच्छता करतोच. सणवार ( remove stains from sink using tomato sauce) म्हटलं की घरात पाहुणे - मंडळी येतात, अशावेळी आपले घर अगदी स्वच्छ व नीटनेटके असावे अशी आपली इच्छा असते. घरासोबतच आपले किचन देखील तितकेच साफसूफ, स्वच्छ आणि लखलखीत (tomato sauce cleaning hack for sink) असावे यासाठी प्रत्येक गृहिणी किचनची साफसफाई अतिशय मेहेनतीने करतेच. किचनची साफसफाई करताना रोज वापरले जाणारे किचन सिंक स्वच्छ करणे तितकेच कठीण, किचकट आणि वेळखाऊ काम असते. रोज वापरुन किचन सिंक इतके खराब होते की, ते स्वच्छ करताना फार मेहेनत घ्यावी लागते(how to clean kitchen sink with tomato sauce).

किचन सिंकमध्ये तेलकट, चिकट, मसाल्यांचे डाग पडतात ते सहज काढणे तसे कठीण असते. यासाठी किचन सिंक स्वच्छ करताना आपण वेगवेगळे महागडे क्लिनर्स, फिनाईल किंवा लिक्विड सोपचा वापर करतो. परंतु याउलट आपण किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी चक्क फ्रिजमध्ये साठवून ठेवलेल्या टोमॅटो केचअपच्या छोट्या सॅशेजचा वापर करून शकतो. अनेकदा बाहेरून काही पदार्थ ऑर्डर केल्यावर त्यासोबत आपल्याला टोमॅटो केचअपचे छोटे सॅशेज फ्री मिळतात, जे महिनोंमहिने आपल्या फ्रिजमध्ये तसेच पडून असतात. याच छोटया टोमॅटो केचअपच्या   सॅशेजच्या मदतीने आपण किचन सिंक अगदी मिनिटभर फारशी मेहेनत न घेता लख्ख करु शकता. हा घरगुती उपाय नेमका काय आहे ते पाहूयात... 

किचन सिंक स्वच्छ करण्याचा घरगुती उपाय... 

किचन सिंक रोजच्या वापराने इतके खराब होते की ते स्वच्छ करणे मोठे अवघड काम होते. किचन सिंकवर तेलकट, चिकट डाग पडतात जे सहज एका धुण्यात जात नाहीत. यासाठी किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी एक साधासोपा घरगुती उपाय useful_human_being या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करताना आपल्याला फ्रिजमध्ये ठेवलेले छोटे टोमॅटो केचअपचे सॅशेज आणि चमचाभर रिठा पावडर इतक्या २ गोष्टींची गरज लागणार आहे. 

एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक!  करा 'हा' जुगाड - फॅन चमकेल नव्यासारखा लख्ख...   

एका डिशमध्ये २ ते ३ टेबलस्पून टोमॅटो केचअप घ्या त्यात चमचाभर रिठा पावडर मिसळून घ्या. आता हे मिश्रण थेट सिंकमध्ये ओता. त्यानंतर तारेची घासणी किंवा स्क्रबरच्या मदतीने किचन सिंक घासून घ्यावे. त्यानंतर ५ ते १० मिनिटे हे मिश्रण असेच सिंकला लावून ठेवावे.

मुसळधार पावसात दरवाजे - खिडक्या फुगून गच्च झाल्या? ६ ट्रिक्स- सहज उघडतील, घासलंही जाणार नाही...

त्यानंतर हलके कोमट पाणी ओतून सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. मग आपण फरक पाहू शकता, किचन सिंकवरील चिकट, तेलकट डाग अगदी सहज जाऊन सिंक पुन्हा नव्यासारखे चमकू लागेल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी