Lokmat Sakhi >Social Viral > स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये घाण साचली? ४ सोप्या गोष्टी करा- खिडक्या होतील स्वच्छ लवकर...

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये घाण साचली? ४ सोप्या गोष्टी करा- खिडक्या होतील स्वच्छ लवकर...

how to clean house window track easily in 10 minutes : window track cleaning tips : easy window track cleaning : quick window track cleaning : house window track maintenance : cleaning window tracks fast : स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स अगदी मिनिटभरात नव्यासारखेच स्वच्छ करण्याची ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2025 11:20 IST2025-08-10T11:15:00+5:302025-08-10T11:20:02+5:30

how to clean house window track easily in 10 minutes : window track cleaning tips : easy window track cleaning : quick window track cleaning : house window track maintenance : cleaning window tracks fast : स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स अगदी मिनिटभरात नव्यासारखेच स्वच्छ करण्याची ट्रिक...

how to clean house window track easily in 10 minutes window track cleaning tips easy window track cleaning quick window track cleaning cleaning window tracks fast | स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये घाण साचली? ४ सोप्या गोष्टी करा- खिडक्या होतील स्वच्छ लवकर...

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये घाण साचली? ४ सोप्या गोष्टी करा- खिडक्या होतील स्वच्छ लवकर...

आपल्या सगळ्यांच्याच घरात स्लायडिंग विंडोज असतात. या स्लायडिंग विंडो वापरायला सोयीस्कर असतात, सहज उघडता किंवा बंद करता येतात. परंतु या स्लायडिंग विंडो फायदेशीर असल्या तरी त्यांचे ट्रॅक्स स्वच्छ करणे म्हणजे फार कठीण काम. या स्लायडिंग विंडोज आपण सहज स्वच्छ करु शकतो परंतु त्याचे ट्रॅक्स स्वच्छ करणे (how to clean house window track easily in 10 minutes) थोडे अवघड व किचकट काम असते. स्लायडिंग विंडोजच्या ट्रॅकमध्ये धूळ, माती, बुरशी साचल्यामुळे त्या अडकायला लागतात आणि सहज उघड-बंद होत नाहीत( window track cleaning tips).

पावसाळ्यात तर या ट्रॅकमध्ये पाण्यामुळे ओलावा साचून गंज चढतो किंवा कुबट वासही येऊ लागतो. स्लायडिंग विंडोजचे ट्रॅक्स स्वच्छ करायचं म्हटलं तरी, ट्रॅकचा भाग खूपच अरुंद असल्याने त्याची साफसफाई (quick window track cleaning) करणेही कठीण जाते. हे ट्रॅक्स स्वच्छ करताना आपला हात त्यात अरुंद ट्रॅक्समध्ये सहज जात नाही, परिणामी ते व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही. परंतु आपण ४ सोप्या ट्रिक्स वापरुन हे स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स अगदी मिनिटभरात नव्यासारखेच स्वच्छ करु शकतो( cleaning window tracks fast).

स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स स्वच्छ करण्याची ट्रिक... 

स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स स्वच्छ करणे अवघड वाटत असले तरी, काळजी करू नका! काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खिडकीचे ट्रॅक्स अगदी कमी वेळात स्वच्छ करू शकता. कंटेंट क्रिएटर शशांक अलशी यांनी यासाठी एक सोपा आणि परिणामकारक उपाय सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रिकने फक्त १० मिनिटांत ट्रॅक अगदी स्वच्छ होतो. खास म्हणजे, शशांक यांनी स्वतः हा उपाय करून दाखवला असून त्याचा परिणाम पाहून तुम्हालाही तो लगेच करून पाहावासा वाटेल.

स्टेप १ :- सर्वप्रथम खिडकीच्या ट्रॅकमध्ये साचलेली सुकलेली धूळ आणि घाण काढून टाकावी. यासाठी जुना टूथब्रश, पेंट ब्रश किंवा कुठलाही छोटा ब्रश घ्या. या ब्रशच्या मदतीने ट्रॅकच्या कोपऱ्यांमध्ये आणि फटींमध्ये अडकलेली धूळ बाहेर काढा. नंतर ही धूळ ट्रॅकच्या बरोबर मधोमध जमा करून घ्या. आता जुना वर्तमानपत्राचा तुकडा किंवा कागद दुमडून ट्रॅकमध्ये अडकवा आणि त्यात साचलेली धूळ भरून बाहेर काढा.

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

पावसाळ्यात फ्रिजमध्ये मीठ ठेवा, ही व्हायरल ट्रिक खरी आहे? खरंच फ्रिजमधला कुबट वास कमी होतो..

स्टेप २ :- स्लायडिंग विंडोजच्या अरुंद ट्रॅक्समधील धूळ काढण्याची ही स्टेप कधीही स्किप करू नका, कारण ती खूप महत्त्वाची आहे. जर थेट लिक्विड क्लिनर वापरले, तर धूळ ओलसर होऊन आतच चिकटून बसेल आणि साफसफाई करणे अधिक कठीण होईल. त्यामुळे धूळ काढल्यानंतर एका बाऊलमध्ये २ चमचे व्हिनेगर, १ चमचा डिशवॉश लिक्विड आणि पाणी घालून घरगुती क्लिनर तयार करा.

स्टेप ३ :- महागडे क्लिनर विकत घेण्यापेक्षा घरच्याघरीच तयार केलेल हे क्लिनर खूप उपयोगी आणि सर्वात स्वस्त असा पर्याय आहे. खरंतर, व्हिनेगर घाण काढण्यात आणि जंतू नष्ट करण्यात अतिशय परिणामकारक आहे, तर डिशवॉश लिक्विड चिकटपणा आणि साचलेली घाण काढण्यास मदत करते. व्हाईट  व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड एकत्रित वापरल्याने साफसफाईची प्रक्रिया सोपी आणि जलद होते.

आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम? तज्ज्ञ सांगतात, कोणते पाणी जास्त फायद्याचे..

स्टेप ४ :- आता तयार केलेल घरगुती क्लिनर खिडकीच्या ट्रॅकवर स्प्रे करा आणि ते सर्व कोपऱ्यांपर्यंत व फटींमध्ये पोहोचेल याची खात्री करा. त्यानंतर हे क्लिनर  २ ते ३ मिनिटे तसेच राहू द्या, जेणेकरून साचलेली घाण मऊ होऊन निघण्यास सोपे होईल. नंतर जुना वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन ट्रॅक चोळून स्वच्छ करा. हवे असल्यास ब्रशचाही वापर करू शकता. साफसफाईनंतर कपड्याने ट्रॅक पुसून घ्या, त्यामुळे तो नव्यासारखा चमकू लागेल. अशाप्रकारे आपण अगदी सहज सोप्या ४ स्टेप्सच्या मदतीने  स्लायडिंग विंडोजचे अरुंद ट्रॅक्स १० मिनिटांत फारशी मेहनत न घेता नव्यासारखे स्वच्छ करु शकतो.


Web Title: how to clean house window track easily in 10 minutes window track cleaning tips easy window track cleaning quick window track cleaning cleaning window tracks fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.