गौरी गणपतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गौरी गणपती हे वर्षाचे अगदी मोठे सण. यानिमित्ताने घरात पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळीही येतात. त्यामुळे त्या दिवसांत घर कसं अगदी साफसफाई करून लख्खं झालेलं हवं. शिवाय जोपर्यंत घराची स्वच्छता होत नाही, तो पर्यंत ते गौरी गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे, असंही वाटत नाही. त्यामुळे घर आवरायचं हे तर आपण ठरवतो, पण नेमकी सुरुवात कुठून करावी आणि ते झटपट आवरून स्वच्छ होईल यासाठी काय करावं आणि काय नाही ते सुधरत नाही (how to clean house fast for Gauri Ganpati festival?). म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा आणि अगदी कमी वेळात झटपट घर आवरून घ्या..(5 tips to make your house clean and dust free)
गौरी गणपतीच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता कशी करावी?
१. गौरी गणपतीच्या स्वागतासाठी घर आवरायचं असेल तर सगळ्यात आधी स्वयंपाक घरापासून सुरुवात करा. भिंतींवरचे जाळे, पंख्यावरची धूळ स्वच्छ करून घ्या. एक्झॉस्ट पंखा, गॅस ओटा, किचन ट्रॉली आवरून घ्या. आता जर बाकीचं सामान काढण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर बरण्या, डबे झाकणांसहीत ओल्या कपड्याने पुसून घ्या. त्यावेळी जे जे अनावश्यक पदार्थ दिसत आहेत, ते लगेच वेगळे काढून टाका. स्वयंपाक घर स्वच्छ होईल.
किती उपाय केले तरी मोगरा काही फुलत नाही? मातीत मिसळा ‘हे’ खास टॉनिक-पावसाळ्यातही येईल बहर
२. फ्रिजची स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग असतो. फ्रिजमध्ये कित्येक अनावश्यक पदार्थ कोंबलेले असतात. एक्सपायरी झालेले पदार्थ तसेच ठेवलेले असतात. ते सगळे बाजुला काढा. फ्रिजचं रबर, दरवाजा आणि आतल्या काचा आठवणीने पुसून घ्या.
३. बेडरुम आवरताना सगळ्यात पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की जे कपडे तुम्ही मागच्या दिड वर्षात घातलेले नाहीत ते सगळ्यात आधी बाजुला काढा आणि एखाद्या गरजवंताला देऊन टाका.
अनावश्यक कपड्यांचा ढिग कमी झाला तर बाकीचं सगळं झटपट आवरून होतं. कपड्यांसोबतच न लागणाऱ्या पर्स, गळ्यातले, कानातले, चपला, बॅग, बाटल्या अशा कित्येक जास्तीच्या वस्तू घरात असतात त्या सगळ्या कोणाला तरी देऊन टाका. घर अगदी स्वच्छ होईल.
४. टॉयलेट बाथरुम, वॉशिंग एरिया, बाल्कनी, अंगन यांची स्वच्छता होणंही खूप गरजेचं आहे. ते काम सणाच्या ६ ते ७ दिवस आधी करा. कारण पुन्हा ते सगळे भाग अस्वच्छ होतात.
५. आता राहिला घराचा मुख्य हॉल आवरण्याचं काम. हॉलसुद्धा अगदी सणाच्या ४ ते ५ दिवस आधी आवरायला घ्या. पडदे, बेडशीट, उशींच्या खोळी पावसाचा अंदाज पाहून धुवून घ्या.
वजन वाढू नये म्हणून जे टाळता; तेच खाऊन करिनाने 'झीरो फिगर' मिळवली होती! वाचा खास गोष्ट
खूप आधीपासून हॉल आवरण्यात वेळ घालवू नका. कारण पुन्हा तिथे पसारा होतोच. या पद्धतीने एकेक करत घर आवरायला घेतलं तर अगदी झटपट स्वच्छता होऊन तुम्ही लवकर मोकळे व्हाल.