हल्ली साेनं खूप महाग झालं आहे. त्यामुळे एरवी अनेक जणी सोन्याचे दागिने अंगावर घालत नाहीत. पण गौरी- गणपतीसारखे मोठे सण असले की हमखास ठेवणीतले सोन्याचे दागिने वर काढले जातात आणि अगदी हौशीने घातले जातात. पण बऱ्याचदा असं होतं की दागिने ठेवून ठेवून किंवा रोज वापरून त्यांची चमक थोडी कमी होते. ते पांढरट दिसू लागतात (how to clean gold jewellery?). म्हणूनच सणासुदीच्या आधी तुमचे सोन्याचे दागिने घरच्याघरी कसे पॉलिश करायचे ते पाहा.. हे उपाय केल्यानंतर दागिने एवढे छान चमकतील की अगदी नुकतेच नवे घडविल्याप्रमाणे झळाळू लागतील.(simple home hacks for cleaning gold jewellery)
सोन्याचे दागिने घरच्याघरी कसे चमकवायचे?
१. बेकिंग सोडा आणि लिंबू
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडे पाणी आणि एखाद्या लिंबाचा रस घाला. आता या पाण्यामध्ये तुमचे सोन्याचे दागिने १५ ते २० मिनिटांसाठी भिजत ठेवा.
गौरी- गणपतीच्या दिवसांसाठी खास ब्यूटी टिप्स- किचनमधले ५ पदार्थ त्वचेला लावा, डेडस्किन, टॅनिंग गायब
यानंतर ते दागिने या मिश्रणातून काढून घ्या आणि एखाद्या टुथब्रशने हळूवारपणे घासून घ्या. सोन्याचे दागिने खूप जोरात घासू नये. त्यांच्यावरची नक्षी खराब होण्याचा धोका असतो. यानंतर दागिने पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. छान चमकतील.
२. लिंबू आणि हळद
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये हळद घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस पिळा. आता ही पेस्ट तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना लावून ठेवा.
डाळिंबाचे मौल्यवान साल फेकू नका, पाहा ५ फायदे-डाळिंबाच्या दाण्याइतकेच गुणकारी आणि महत्वाचे
१० मिनिटांतनी दागिने टुथब्रश वापरून घासून घ्या. यानंतर पाण्याने धुवून घ्या. अगदी नवेच घडविल्यासारखे लख्खं चमकतील.
३. व्हिनेगर आणि पाणी
व्हिनेगर आणि पाणी हे मिश्रणही सोन्याचे दागिने चमकविण्यासाठी वापरता येते. हा उपाय करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी १: २ या प्रमाणात घ्या.
कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका
यानंतर यामध्ये १० ते १५ मिनिटे सोन्याचे दागिने भिजत घाला. त्यानंतर एकदा दागिने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले की त्यांच्यावरचा सगळा मळ निघून गेलेला असेल.