Join us

गॅस शेगडीवरचे डाग काढा झटपट, घ्या फक्त १ चमचा मीठ-१ चमचा पीठ! पाहा भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 22:05 IST

Quick gas stove cleaning tips: How to clean gas stove in 5 minutes: Remove burn marks from gas stove: Effective gas stove cleaning hacks: Fast kitchen cleaning tips: Burnt kitchen appliance cleaning: Easy gas stove cleaning solution: Cleaning inside of a gas stove: Natural gas stove cleaner : स्वयंपाक घरातील २ पदार्थ, अगदी मिनिटभरात शेगडीवरील चिकट, मेणचट डाग काढतात - पाहा सोपा उपाय...

गॅस शेगडी हे आपल्या किचनमधील सगळ्यांत महत्वाच आणि आवश्यक उपकरणं आहे. स्वयंपाकघरात दररोज गॅस शेगडीचा वापर होतच असतो. गॅस शेगडी दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत (Quick gas stove cleaning tips) वापरल्याने ती तितकीच खराब आणि अस्वच्छ देखील होते. गॅस शेगडीचा वरचा भाग स्वच्छ ठेवणं स्वयंपाकघराच्या (How to clean gas stove in 5 minutes) स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाचं असतं. या गॅस शेगडीवर आपण दिवसभरात अनेक ( Remove burn marks from gas stove) पदार्थ तयार करतो. हे पदार्थ करताना तेल, मसाले यांसारखे वेगवेगळे पदार्थ गॅस शेगडीवर पडतात, आणि अशी शेगडी वेळीच स्वच्छ केली नाही तर शेगडीचा वरचा भाग खराब दिसतो(Effective gas stove cleaning hacks).

शेगडी जर वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यावर चिकट, मेणचट थर साचू लागतो, असा थर साचल्याने शेगडी खराब होते. गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी आपण अनेकदा लिक्विड सोप, महागडे डिटर्जंट, साबण वापरतो परंतु काहीवेळा त्यावरील चिकट, मेणचट डाग सहजासहजी जात नाहीच. अशावेळी आपण घरातील काही पदार्थांचा वापर करून अगदी मिनिटभरात शेगडीवरील चिकट, मेणचट डाग सहज काढू शकतो. घरातील नेहमीच्या पदार्थांपैकीच कोणत्या दोन पदार्थांच्या मदतीने आपण शेगडी नव्यासारखी लख्ख करु शकतो ते पाहूयात. 

गॅस शेगडीवरील तेलकट डाग घालवण्यासाठी... 

गॅस शेगडीवरील तेलकट डाग सहज निघत नाही. काहीवेळा तर लिक्विड सोप, डिटर्जंटने देखील हे तेलकट डाग जात नाहीत अशावेळी चमचाभर गव्हाचे पीठ फायदेशीर ठरु शकते. गॅस शेगडीवरील तेलकट डाग काढून टाकण्यासाठी, या तेलकट डागांवर गव्हाचे पीठ भुरभुरवून घालावे. त्यानंतर १० ते १५ मिनिटे हे पीठ डागांवर तसेच राहू द्यावे. त्यानंतर हे पीठ हलकेच थेट डागांवर घासून संपूर्ण शेगडी पिठाच्या मदतीने स्वच्छ करून घ्यावी, गव्हाचे पीठ तेल शोषून घेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे लिक्विड सोप, डिटर्जंट आणि पाण्याच्या मदतीने शेगडी स्वच्छ धुवून घ्यावी. हा उपाय केल्यास शेगडीवरील तेलकट डाग अगदी सहज निघून जातात. 

फेस फॅट वाढून चेहरा वयस्क - थोराड दिसतो? ५ सवयी, तारुण्य परत येईल कायमचं... 

गॅस शेगडीवरील चहा, कॉफी, दुधाचे डाग घालवण्यासाठी... 

गॅस शेगडीवरील चहा, कॉफी, दुधाचे डाग घालवण्यासाठी चमचाभर मीठ पुरेसे आहे. काहीवेळा चहा, कॉफी, दुध ओतू जाते आणि त्याचे चिकट, हट्टी डाग सुकले की लगेच निघत नाहीत. अशावेळी या डागांवर थेट चमचाभर मीठ, लिक्विड सोप, व्हिनेगर, बेकिंग सोडा घालावे. त्यानंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे डाग व्यवस्थित घासून घ्यावेत. मग नेहमीप्रमाणे लिक्विड सोप, डिटर्जंट आणि पाण्याच्या मदतीने शेगडी स्वच्छ धुवून घ्यावी. शेगडीवरील चहा, कॉफी, दुधाचे सुकलेले डाग काढण्यासाठी मीठ फायदेशीर ठरते. अशाप्रकारे, आपण घासणी किंवा स्क्रबरचा वापर न करता अगदी १० ते १५ मिनिटांत खराब झालेली गॅस शेगडी स्वच्छ करु शकतो.

करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी