Join us

गॅस शेगडी दिसेल नव्यासारखी लख्ख! ४ टिप्स - न घासताच चिकट - तेलकट डाग निघतील सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2025 19:16 IST

how to clean gas shegdi : easy tips to clean gas stove at home :best home remedies to clean gas shegdi : natural ways to clean gas burner and stove : how to clean oily gas stove easily : गॅस शेगडीवरील चिकट - मेणचट डाग काढताना होते दमछाक, मग करुन पाहा हे सोपे उपाय...

घरात स्वयंपाकासाठी सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू म्हणजे गॅस शेगडी. रोजच्या वापरामुळे आणि तेलाचे किंवा मसाल्यांचे चिकट डाग पडून शेगडी लवकर खराब होते. गॅस शेगडी कितीही महागडी किंवा आकर्षक असली, तरी ती रोज स्वच्छ केली नाही तर तिच्यावर जमा झालेले डाग आणि चिकटपणा संपूर्ण स्वयंपाकघराचा लूक (easy tips to clean gas stove at home) बिघडवतात. गॅस शेगडी ( how to clean oily gas stove easily) सकाळपासून ते रात्रीपर्यंत सतत वापरल्याने ती खराब आणि अस्वच्छ देखील लगेचच होते. गॅस शेगडीचा वरचा भाग स्वच्छ ठेवणं स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी खूपच महत्वाचं असतं(best home remedies to clean gas shegdi).

गॅस शेगडीवर आपण दिवसभरात अनेक पदार्थ करतो. हे पदार्थ तयार करताना त्यावर मसाले, तेल असे अनेक पदार्थ सांडतात, अशा परिस्थिती जर ती वेळीच स्वच्छ केली नाही तर त्याचा वरचा भाग खूपच खराब होतो. या गॅस शेगडीवर चिकट, मेणचट थर साचू लागतो, असा चिकट - हट्टी थर सहजासहजी निघत नसल्याने शेगडी स्वच्छ करणे म्हणजे अनेकींना कंटाळवाणे वाटते. पण काळजी करू नका! काही सोप्या घरगुती क्लिनिंग ट्रिक्स वापरून आपण गॅस शेगडीला अगदी काचेसारखे चकाचक करू शकता. कमी वेळात आणि फारसे कष्ट न घेता गॅस शेगडी स्वच्छ व चमकदार कशी करावी याची ट्रिक पाहूयात. 

हे उपाय करून पाहा... 

१. लिंबाचा रस आणि मीठ :- लिंबाच्या रसामध्ये थोडेसे मीठ मिसळून ते शेगडीवर ओतून स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या. २० मिनिटांनंतर ओल्या कपड्याने स्वच्छ करा. यामुळे शेगडी नव्यासारखी चकाचक होईल.

२. गरम पाणी आणि डिटर्जंट :- भांडी धुण्याच्या डिटर्जंटमध्ये गरम पाणी मिसळून ते शेगडीवर ओतून स्क्रबरने घासून स्वच्छ करा. गरम पाणी शेगडीवरील  काळेपणा आणि चिकटपणा कमी करण्यास मदत करेल.

छोट्याशा कुंडीतही लावता येईल बटाटा, सोपा प्रयोग करून पाहा - घरच्या ताज्या कोवळ्या बटाट्याचा आनंद मोठा...

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

३. व्हिनेगर आणि पाणी :- व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि शेगडीवर स्प्रे करा. थोड्या वेळाने स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. व्हिनेगर जंतूंना मारते आणि शेगडीला उत्तम चमक देते.

४. बेसन आणि लिंबू :- बेसन आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करून ते शेगडीवर स्क्रबरच्या मदतीने लावून घासून घ्या. यामुळे गॅस स्टोव्हवर जमा झालेला चिकटपणा आणि काळेपणा दूर होण्यास मदत होईल.

 शेगडीवरील हट्टी काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि मीठ, भांडी धुण्याचा डिटर्जंट, व्हिनेगर आणि बेसन यांसारखे घरगुती उपाय खूप असरदार आहेत. या सोप्या ट्रिक वापरून आपण गॅस शेगडी सहजपणे साफ करू शकता आणि तिला नव्यासारखे चकचकीत करु शकता. या उपायांनी तुम्ही येणाऱ्या दिवाळीत घर स्वच्छ करताना तुमच्या गॅस शेगडीचीही सफाई करू शकता. यामुळे तुमची शेगडी अगदी चमकदार आणि नवीन दिसेल, ते ही अगदी फुकटात. 

रोज करा सफाई... 

गॅस शेगडीला स्वच्छ करण्यासाठी आणि ती साफ ठेवण्यासाठी नियमितपणे तिची सफाई करणे गरजेचे आहे. एखाद्या खास प्रसंगाची वाट पाहत बसू नका. जर तुम्ही रोजच्या रोज हे उपाय करून शेगडी साफ केली, तर त्यावर जास्त घाण जमाच होणार नाही. वर सांगितलेल्या टिप्स यासाठी फायदेशीर ठरु शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean Your Gas Stove Like New: 4 Easy, No-Scrub Tips

Web Summary : Keep your gas stove sparkling with these simple home remedies. Lemon, vinegar, baking soda, and dish soap can remove grease and grime easily. Regular cleaning prevents stubborn buildup, keeping your kitchen spotless.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी