Join us

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक! गॅस लवकर संपणार नाही, इतका सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 16:05 IST

how to clean gas burner : how to clean gas stove burner at home : easy way to clean gas burner : natural hacks for cleaning gas burner : remove oil stains from gas stove burner : चिकट - तेलकट गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठीची सोपी युक्ती...

'गॅस शेगडी' ही किचनमधील सर्वात महत्वाची गोष्ट. दररोज आपण किचनमधील गॅस शेगडीचा वापर करतोच. आपल्या स्वयंपाकघरातील गॅस बर्नर हे रोजच्या वापराने अनेकदा चिकट आणि काळसर होतात. खरंतरं, गॅस बर्नरच्या छिद्रांमध्ये काहीवेळा अन्नकण जाऊन अडकून बसतात. याचबरोबर या छिद्रांवर चिकट, तेलकट (how to clean gas stove burner at home) थर साचत राहिला तर गॅस व्यवस्थित पेटत देखील नाही. गॅसच्या ज्वाला देखील असमान पद्धतीने बाहेर येतात. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे घराच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, प्रत्येक गृहिणी गॅस जास्त दिवस चालावा आणि त्याचा वापर कमी व्हावा अशी प्रत्येकीची इच्छा असतेच( remove oil stains from gas stove burner ).

गॅसचा वापर बर्नरच्या स्थितीवरही अवलंबून असतो. अनेकदा गॅस बर्नरची छिद्रं बंद होतात किंवा त्यातून निळ्याऐवजी पिवळी ज्योत बाहेर पडू लागते. याचे कारण असे आहे की, बर्नरमध्ये धूळ, तेल आणि खाद्यपदार्थ जमा होतात, ज्यामुळे गॅसचा प्रवाह योग्य प्रकारे होत नाही. यामुळे, गॅस पूर्णपणे जळत नाही आणि मोठ्या प्रमाणात वाया जातो. यामुळे फक्त सिलेंडर लवकर रिकामा होत नाही, तर जेवण देखील नीट शिजत नाही. अशा परिस्थितीत, बर्नर जर योग्य पद्धतीने स्वच्छ केले तर गॅस वाया जात नाही तसेच गॅस सिलेंडर बरेच दिवस वापरता येतो. काही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरल्या तर गॅस बर्नर अगदी इन्स्टंट पद्धतीने स्वच्छ करता येतो आणि त्यांचा वापरही करणे सोपे जाते. गॅस बर्नर जर वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ केला तर त्यावर चिकट, तेलकट थर साचत नाही आणि बर्नर योग्य पद्धतीने काम करतात. 

चिकट - तेलकट गॅस बर्नर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक... 

जर गॅस बर्नरवर तेलाचे, मसाल्यांचे चिकट, तेलकट डाग पडले तर बर्नर व्यवस्थित पेटंट नाहीत. अशावेळी गॅस बर्नर योग्य पद्धतीने स्वच्छ करून त्याच्या छिद्रांमधील घाण काढणे गरजेचे असते. geniussukanya या इंस्टाग्राम वरील अकाऊंटवरून गॅस शेगडीचा बर्नर घरच्या घरीच स्वच्छ करण्याची साधीसोपी ट्रिक शेअर केली आहे. ही खास ट्रिक वापरुन आपण अगदी झटपट बर्नर नव्यासारखा स्वच्छ करु शकतो. 

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी पद्धत... 

गॅस बर्नर घरच्याघरीच स्वच्छ करण्यासाठी आपण किचमध्येच असणाऱ्या काही घरगुती पदार्थांचा वापर करु शकतो. गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ग्लासभर गरम पाणी, २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस, ३ ते ४ लिंबाच्या साली, १ टेबलस्पून बेकिंग सोडा, १ पाकीट इनो आणि जुना टूथब्रश इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

सगळ्यात आधी बर्नर काढून एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवून द्यावेत. त्याच बाऊलमध्ये गरम पाणी ओतावे, बर्नर पूर्णपणे त्यात भिजतील असे पाहावे. त्यानंतर, या बाऊलमध्ये लिंबाचा रस व लिंबाच्या साली घालाव्यात. मग त्यात बेकिंग सोडा, इनो घालावा. आता याच मिश्रणात बर्नर ४ ते ५ तास पूर्णपणे भिजत ठेवा. त्यानंतर  जुन्या टूथब्रशने बर्नर घासून घ्यावा मग नेहमीप्रमाणे लिक्विड सोपं, किंवा साबणाने बर्नर स्वच्छ घासून घ्यावेत. हा उपाय केल्यानंतर आपण पाहू शकता की बर्नर नव्यासारखे चमकदार दिसतील व त्याच्या छिद्रांमध्ये अडकलेले अन्नकण सहज निघून छिद्र मोकळी होतील. यासोबतच, बर्नरवरील चिकट, काळपट थर सहज निघून बर्नर स्वच्छ दिसतील.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स