Join us
Daily Top 2Weekly Top 5

किचनमधलं फर्निचर पुसण्याची खास ट्रिक-मुंग्या-चिलटं गायब! फर्निचर दिसेल वर्षानूवर्षे नव्यासारखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 17:26 IST

Cleaning Tips For Kitchen Furniture: स्वयंपाक घरातलं फर्निचर पुसण्याच्या काही खास ट्रिक पाहुया..(2 simple tricks to clean furniture in kitchen to get rid of ants, insects, cockroaches and lizards)

स्वयंपाक घरात सतत काही ना काही काम चालू असतं. भाज्या निवडणे, चिरणे, फळं कापणे, कणिक भिजवणे अशी कामं सतत सुरू असतात. त्यातून ओला कचरा तयार होतो, कुठे ना कुठे काही तरी सांडतं, पडतं त्यामुळे स्वयंपाक घर नेहमीच आवरावं लागतं. कारण तिथे सतत काही ना काही खरकटं असतं. त्यामुळे मग मुंग्या होतात, झुरळं होतात. माशा आणि चिलटंही होतात (Cleaning Tips For Kitchen Furniture). हे सगळं कमी करायचं असेल आणि स्वयंपाक घरातलं इतर फर्निचर तसेच डायनिंग टेबलही काम स्वच्छ आणि नव्यासारखा चकचकीत ठेवायचा असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून फर्निचर पुसा.(2 simple tricks to clean furniture in kitchen to get rid of ants, insects, cockroaches and lizards) 

 

किचनमधलं फर्निचर तसेच डायनिंग टेबल पुसण्याची खास ट्रिक

१. किचनमधलं फर्निचर आठवड्यातून एक- दोन वेळा तरी पुढे सांगितलेल्या पद्धतीने पुसावे. यासाठी एका भांड्यात १ लीटर पाणी असेल तर १ चमचा मीठ घ्या. तसेच अर्धा चमचा डिशवॉश लिक्विड घ्या.

प्रेमानं कुणासाठी गिफ्ट घेता पण त्यांना त्याचं कौतुकच नाही? गिफ्ट देताना ‘ही’ १ गोष्ट कायम लक्षात ठेवा

आता या पाण्यात एक कॉटनचा कपडा बुडवा आणि तो घट्ट पिळून त्याने फर्निचर पुसून काढा. मीठ आणि डिशवॉशमुळे फर्निचर स्वच्छ राहील तसेच मुंग्या, चिलटं, झुरळं यांचं प्रमाणही कमी होईल.

 

२. कापुराच्या ७ ते ८ वड्या घ्या. तसेच ७ ते ८ लवंग घ्या. हे दोन्ही एकत्र करून कुटून त्याची पावडर करा. आता या पावडरमध्ये थोडं ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल घाला.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

आता या तेलाने डायनिंग टेबल तसेच किचनमधलं फर्निचर पुसा. लवंग आणि कापुरामध्ये चिलंट, मुंग्या, पाली, झुरळं कमी होतील आणि ऑलिव्ह ऑईलमुळे फर्निचरला छान चमक येईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean kitchen furniture with these tricks; get rid of pests!

Web Summary : Keep your kitchen furniture and dining table clean and pest-free with these simple tricks. Use salt and dish soap solution or camphor, clove, and oil mixture for a sparkling, insect-free kitchen.
टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकिचन टिप्स