Join us

फ्रिजच्या दरवाज्याच्या रबरवर आली बुरशी? २ सोपे उपाय- १० मिनिटांत काळवंडलेलं रबर होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 16:15 IST

Cleaning Tips: फ्रिजच्या दरवाज्याचं रबर काळसर, हिरवट बुरशी लागून घाण झालं असेल तर हे काही उपाय करून पाहा.(how to clean fungus on the sealing rubber of refrigerator door?)

ठळक मुद्देही बुरशी स्वच्छ केली नाही तर आरोग्यासाठीही ते धोकादायक ठरू शकतं.

फ्रिज आता जवळपास सगळ्याच घरांमध्ये आहे. कारण ती एक अतिशय गरजेची वस्तू झालेली आहे. बऱ्याचदा तर फ्रिजमध्ये खूप अनावश्यक वस्तू कोंबून ठेवल्या जातात आणि त्यामुळे मग फ्रिज अस्वच्छ होत जाते. फ्रिजच्या आतल्या काचा, दरवाज्याचा बाहेरचा भाग आपण नेहमीच पुसून घेतो, स्वच्छ करतो. पण सगळ्यात जास्त दुर्लक्ष होते ते त्याच्या दरवाजाला असणाऱ्या रबराकडे. त्या रबरावर हिरवट, काळपट बुरशी लागलेली दिसते. पावसाळ्यात तर त्याचे प्रमाण जरा जास्तच वाढते. ही बुरशी स्वच्छ केली नाही तर आरोग्यासाठीही ते धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून फ्रिजचं काळवंडलेलं रबर स्वच्छ करा.(how to clean fungus on the sealing rubber of refrigerator door?)

फ्रिजच्या दरवाजाच्या रबरवर जमा झालेलं फंगस कसं स्वच्छ करायचं?

 

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर या दोन पदार्थांचा वापर करून फ्रिजच्या दरवाज्याच्या रबरावर जमा झालेलं फंगस किंवा बुरशी काढून टाकता येते. हा उपाय करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एका भांड्यामध्ये एकत्र करा.

आजीबाईंना सलाम! १०० वर्षांच्या असूनही जीममध्ये जाऊन करतात व्यायाम, वाचा त्यांच्या निराेगी दिर्घायुष्याचं सिक्रेट

या मिश्रणात कापसाचा बोळा बुडवा आणि त्या बोळ्याने दरवाज्याचे रबर चोळून घ्या. यानंतर स्वच्छ पाण्याने रबर पुसून घेतल्यास तिथली बुरशी निघून गेलेली दिसेल. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर त्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. 

 

२. टूथपेस्ट आणि डिश वॉश लिक्विड

दुसरा उपाय म्हणजे टूथपेस्ट आणि डिश वॉश लिक्विड यांचा एकत्रित वापर. यासाठी एका वाटीमध्ये टूथपेस्ट घ्या. जेवढे टूथपेस्ट असेल तेवढेच डिश वॉश लिक्विड त्यात घाला आणि थोडे गरम पाणी घाला.

मुसळधार पावसात भाज्या महागल्या? करा २ टोमॅटोंचा ठेचा फक्त ५ मिनिटांत, जेवणाचा बेत होईल मस्त

सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि त्या मिश्रणाने फ्रिजच्या दरवाजाचे रबर घासून घ्या. यानंतर स्वच्छ ओलसर कपड्याने रबर पुसून घ्या. बुरशी जाऊन दरवाजा अगदी स्वच्छ होईल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी