Join us

वॉटर प्युरीफायरमधून येणाऱ्या पाण्याची धार बारीक झाली? बघा ट्रिक- फिल्टर स्वच्छ होऊन पाण्याचा फ्लो वाढेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 12:44 IST

Cleaning Tips: वॉटर प्युरीफायरचं फिल्टर घरच्याघरी कसं स्वच्छ करायचं त्याची ही ट्रिक पाहून घ्या.. सगळ्यांनाच अतिशय उपयोगी येणारी आहे..(how to clean filter of water purifier at home?)

ठळक मुद्देवॉटर प्युरीफायरचे फिल्टर स्वच्छ करणे हे अवघ्या ४ ते ५ मिनिटांचे आणि अतिशय सोपे काम आहे.

हल्ली प्रदुषित पाणी येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. शिवाय दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचीही भीती असतेच. म्हणूनच हल्ली घरोघरी वॉटर प्युरीफायर बसवलं जातं. वॉटर प्युरीफायर किंवा आरओमधून जे पाणी येतं ते त्यामध्ये बसवलेल्या फिल्टरमुळे शुद्ध आणि स्वच्छ झालेलं असतं. पण रोजच्यारोज त्याचा वापर असल्याने काही दिवसांतनी फिल्टर अगदी अस्वच्छ होऊन जातं. त्यात घाण साचून राहायला सुरुवात होते. हळूहळू मग त्यातली घाण वाढल्याने त्याच्यातून येणाऱ्या पाण्याची धारसुद्धा बारीक होऊन जाते. अशावेळी घरच्याघरी काय उपाय करायचा ते पाहा...(how to clean filter of water purifier at home?)

 

वॉटर प्युरीफायरचे फिल्टर कसे स्वच्छ करावे?

वॉटर प्युरीफायरचे फिल्टर स्वच्छ करणे हे अवघ्या ४ ते ५ मिनिटांचे आणि अतिशय सोपे काम आहे. पण तेच नेमके आपल्याला येत नाही. त्यामुळे मग ते रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला बोलवावे लागते.

थंडीमुळे पाय कोरडे पडू लागले- तळपायांच्या भेगा वाढल्या? 'हा' होममेड फुटमास्क लावा- पाय होतील मऊ

त्या माणसासाठी कमीतकमी ५०० रुपये तरी फिस मोजावी लागतेच.. २ ते ३ महिन्यांनी ही अडचण येतेच. दरवेळी त्या व्यक्तीला बोलावून एवढे पैसे देणं परवडणारं नसतंच. म्हणूनच आता ही एक अतिशय सोपी ट्रिक पाहा आणि घरच्याघरी दर महिन्याला वॉटर फिल्टर स्वच्छ करा..

 

त्यासाठी सगळ्यात आधी प्युरीफायरचं फिल्टर काढून घ्या. त्यावर पाणी टाकून ते आधी स्वच्छ करा. यामुळे वरवरची घाण निघून जाईल. पण ते आतून स्वच्छ करण्यासाठी मात्र फिल्टरच्या मधोमध असणाऱ्या छिद्रात पाण्यात धार सोडा. आता त्यात पाणी भरल्यानंतर जोरात फुंकर मारा.

गुलाबी थंडीत खा चिंचेचा चटपटीत भात! रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट वन डिश मील, रेसिपी अगदीच सोपी

पाणी खालच्या बाजुने वेगात बाहेर पडेल आणि त्या पाण्यासोबत फिल्टरमध्ये अडकलेली घाणही बाहेर येईल. असं साधारण ५ ते ६ वेळा करा. फुंकल्यानंतर जेव्हा पाण्यातून घाण बाहेर पडणं बंद होईल, तेव्हा तुमचं फिल्टर स्वच्छ झालं आहे, हे समजावं. यानंतर फिल्टर लावून टाका आणि वॉटर प्युरीफायर चालू करून पाहा. पाण्याची धार नक्कीच वाढलेली असेल. एकदा ट्राय करून पाहा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Water purifier flow reduced? Clean the filter, increase the flow!

Web Summary : Is your water purifier's flow weak? Clean the filter at home! Remove it, wash it, blow air through the center hole to dislodge dirt. Repeat until clean water flows. This simple trick restores water flow, saving repair costs.
टॅग्स :स्वच्छता टिप्सपाणीसोशल व्हायरल