बहुतांश स्वयंपाक घरांमध्ये एक्झॉस्ट पंखे असतातच. रोज किचनमध्ये स्वयंपाक होत असताना ते आपण चालू करून ठेवतो. जेणेकरून स्वयंपाक करताना तयार होणारा सगळा धूर, वाफा त्या पंख्याद्वारे घराबाहेर फेकल्या जातात. पण यामुळे एक्झॉस्ट पंखा मात्र चांगलाच चिकट, तेलकट होऊन जातो. त्याच्यावर चिकटपणाचा अक्षरश: काळा थर साचलेला असतो. तो स्वच्छ करणं हे खूप कठीण आणि वेळखाऊ काम. त्यामुळे ते करण्याचा अनेकांना खूप कंटाळा येतो आणि मग एक्झॉस्ट पंखा दिवसेंदिवस जास्तच घाण होत जातो (how to clean exhaust fan in kitchen?). म्हणूनच पुढे सांगितलेला एक सोपा उपाय पाहा आणि अवघ्या काही मिनिटांत पंखा अगदी नव्यासारखा चकाचक करा..(cleaning tips for exhaust fan in kitchen)
एक्झॉस्ट पंखा कसा स्वच्छ करावा?
१. एक्झॉस्ट पंखा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी २ चमचा डिटर्जंट पावडरमध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे गरम पाणी घाला. यानंतर हे पाणी एक्झॉस्ट पंख्यावर शिंपडा.
तुमची पण त्वचा खूप सेन्सिटीव्ह आहे? ५ पदार्थ खाणं टाळा, त्वचा राहील निरोगी, सुंदर
त्यानंतर १० मिनिटांनी तारेची घासणी किंवा ब्रश घ्या. एक्झॉस्ट पंख्यावर थोडे टॉयलेट क्लिनर टाका आणि पंखा घासून काढा. अगदी ५ ते ६ मिनिटांतच तुम्हाला पंख्यावरचा चिकटपणा अलगद निघून आलेला दिसेल. पण हा उपाय करताना हातात ग्लोव्ह्ज घाला. तसेच डोळ्यांनाही जपा.
२. एक्झॉस्ट पंखा स्वच्छ करण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला टुथपेस्ट वापरायचं आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण करा
आठवड्यातून एकदा तरी 'हे' पदार्थ खायलाच हवे! वजन वाढण्याचं टेन्शनच नाही- नेहमीच राहाल फिट, एनर्जेटिक
आणि ते काही मिनिटांसाठी पंख्यावर शिंपडून ठेवा. त्यानंतर टुथपेस्ट घ्या. जेवढं टुथपेस्ट असेल तेवढं त्यात मीठ घाला. आता हे मिश्रण पंख्याला लावून पंखा घासून काढा. काही मिनिटांतच तो अगदी स्वच्छ होईल.
