Cleaning Tips : झोपेतून उठवल्यावर चहा बनवणं हे भारतीय घरांमधील डेली रूटीन असतं. पण चहा बनवण्यासाठी वापरलं जाणारं पातेलं काळं पडतं. ही समस्या प्रत्येक घरातील आणि चहाच्या टपरीवर बघायला मिळते. चहामधील दूध आणि चहा पावडरमुळे पातेल्यात पडणारे काळे डाग घासून घासूनही निघत नाही. शेवटी हे काळे डाग पातेल्यावर तसेच राहतात. यानं पातेल्याची चमकही कमी होते. मात्र, हे काळे डाग दूर करणं इतकंही अवघड नाही. पातेलं पुन्हा नव्यासारखं चमकवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती सांगणार आहोत.
काळ्या डागाचं कारण?
चहा बनवताना दूध आणि चहा पावडर उकडण्याच्या प्रक्रियेमध्ये काही तत्व भांड्याच्या तळाशी जमा होतात. हेच तत्व काही काळानं जमा होऊन डाग बनतात. जर हे पातेलं नियमितपणे साफ केलं नाही तर निशाण आणखी डार्क होतं.
काय कराल उपाय?
१) बेकिंग सोडा आणि लिंबू
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पातेल्याच्या काळ्या डागावर लावा आणि १५ ते २० मिनिटं तशीच ठेवा. नंतर स्क्रबरच्या मदतीनं घासा. नियमितपणे हा उपाय कराल तर पातेल्यावरील काळे डाग दूर होतील आणि पातेलं पुन्हा चमकदार होईल.
२) व्हिनेगर आणि मीठ
व्हिनेगर आणि मीठ समान प्रमाणात मिक्स करून पातेल्यावर लावा. हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी तसंच पातेल्यावर लावून ठेवा आणि नंतर कापडाच्या मदतीनं घासा. व्हिनेगरमधील अॅसिडिक तत्व आणि मिठानं पातेलं घासल्यास काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.
३) डिशवॉश डिटर्जेंट आणि गरम पाणी
जर काळे डाग जास्त डार्क नसतील, तर गरम पाण्यात डिशवॉश डिटर्जेंट मिक्स करून पातेल्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. नंतर स्क्रबरच्या मदतीनं पातेलं घासा. काही दिवस हा उपाय केल्यास पातेलं पुन्हा चमकेल.
४) स्टील क्लीनर
पातेल्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या स्टील क्लीनरचाही वापर करू शकता. हे स्पंज किंवा कापडावर लावून पातेलं साफ करा. स्टील क्लीनरचा वापर केल्यावर पातेलं चांगलं स्वच्छ करून घ्यावं.
इतर काही टिप्स
१) चहा बनवल्यानंतर पातेलं लगेच घासून स्वच्छ करा.
२) पातेलं जास्त वेळ गॅसवर ठेवू नका. यानंही पातेल्यावर काळे डाग पडता.
३) नियमितपणे पातेलं घासा. जेणेकरून काळे डाग पडणार नाहीत.