Lokmat Sakhi >Social Viral > चिखलाने माखलेले 'क्रॉक्स' स्वच्छ करण्याचा भन्नाट जुगाड! कळकट चपला होतील एकदम नव्यासारख्या...

चिखलाने माखलेले 'क्रॉक्स' स्वच्छ करण्याचा भन्नाट जुगाड! कळकट चपला होतील एकदम नव्यासारख्या...

how to clean crocs at home : easy way to clean crocs : crocs cleaning hacks : home remedies to clean crocs : how to make crocs look new again : how to remove stains from crocs : पावसाळ्यात खराब झालेले क्रॉक्स घरच्याघरीच स्वच्छ करण्याचा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 15:51 IST2025-07-26T15:39:11+5:302025-07-26T15:51:30+5:30

how to clean crocs at home : easy way to clean crocs : crocs cleaning hacks : home remedies to clean crocs : how to make crocs look new again : how to remove stains from crocs : पावसाळ्यात खराब झालेले क्रॉक्स घरच्याघरीच स्वच्छ करण्याचा सोपा उपाय...

how to clean crocs at home easy way to clean crocs crocs cleaning hacks home remedies to clean crocs how to make crocs look new again | चिखलाने माखलेले 'क्रॉक्स' स्वच्छ करण्याचा भन्नाट जुगाड! कळकट चपला होतील एकदम नव्यासारख्या...

चिखलाने माखलेले 'क्रॉक्स' स्वच्छ करण्याचा भन्नाट जुगाड! कळकट चपला होतील एकदम नव्यासारख्या...

पावसाळ्यात चिखल, पाणी, माती पायाला फारशी लागू नये, यासाठी आपण शक्यतो हाच विचार करुन पावसाळी चपला, बुटांची निवड करतो. सध्या पावसाळ्यात घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल, ट्रेंडी आणि सगळ्यांच्या पायात शोभून दिसणारे (how to clean crocs at home) असे 'क्रॉक्स' प्रत्येकजण वापरतो. हलके, आरामदायक (easy way to clean crocs) आणि पटकन सुकणारे असल्यामुळे अनेकजण पावसात क्रॉक्स घालणं पसंत करतात. खरंतर, या 'क्रॉक्स' पॅटर्नच्या चपलांची (crocs cleaning hacks) रचनाच अशी असते की संपूर्ण पाय यात पूर्णपणे कव्हर केला जातो त्यामुळे पायाला चिखल लागत नाही. याचबरोबर, या क्रॉक्सवर छोटी - छोटी छिद्र देखील असतात ज्यामुळे पावसाचे पाणी जरी चपलेत शिरले तरी ते साचून न राहता लगेच या छिद्रांमधून बाहेर येते. तसेच हे क्रॉक्स संपूर्णपणे रबरी असल्याने चालताना पायाला ग्रीप मिळते, पाय घसरून पडण्याचा प्रश्नच नसतो(home remedies to clean crocs).

असे हे पावसाळ्यात घालता येतील असे फायदेशीर क्रॉक्स दररोजच्या वापराने काहीवेळा अगदीच मळून जातात. पावसाळ्यातील चिखल, धूळ आणि सतत पाण्यात वापरल्यामुळे हे क्रॉक्स फार (how to make crocs look new again) लवकर मळकट आणि खराब दिसायला लागतात. यासाठीच, आपण घरच्याघरीच (how to remove stains from crocs) एका सोप्या पण भन्नाट ट्रिकने क्रॉक्स झटपट स्वच्छ करु शकतो. यासाठी घरगुती उपाय काय आहे ते पाहूयात... 

मळके, खराब झालेले क्रॉक्स कसे स्वच्छ करावेत ?

क्रॉक्स घरच्याघरीच कसे स्वच्छ करावेत आणि त्यासाठी काय वापरावे याबद्दलचा व्हिडिओ alshihacks या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. मळके, खराब झालेले क्रॉक्स स्वच्छ करण्यासाठी आपल्याला बादलीभर पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा, डिश वॉश लिक्विड सोप, जुना टूथब्रश  इतक्या ४ गोष्टींची गरज लागणार आहे. 

घर स्वच्छ करणारा झाडूच कळकट-घाणेरडा दिसतो? ४ टिप्स, एका मिनिटांत झाडू होईल स्वच्छ नव्यासारखा...

लोखंडी कढई - तव्यावर काळाकुट्ट गंज चढला? १ घरगुती उपाय, करेल मिनिटांत काम सोपे...

करायचं काय ? 

सगळ्यांतआधी नळाच्या वाहत्या पाण्याखाली किंवा जेट स्प्रे खाली धरुन क्रॉक्सवर लागलेली धूळ, माती काढून घ्यावी. त्यानंतर एका बादलीत पाणी भरुन घेऊन त्यात ते क्रॉक्स १० ते १५ मिनिटे भिजत ठेवून द्यावेत. मग एका बाऊलमध्ये, प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा, डिश वॉश लिक्विड सोप आणि पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी.

कढई - तव्याच्या कडेला साचला काळाकुट्ट थर? १ भन्नाट ट्रिक - न घासताच होईल मिनिटांत चकाचक...

ही तयार पेस्ट थेट जुन्या टूथब्रशच्या मदतीने क्रॉक्सवर लावून घ्यावी. ब्रशने क्रॉक्स व्यवस्थित घासून घ्यावेत. मग  नळाच्या वाहत्या पाण्याखाली किंवा जेट स्प्रे खाली धरुन क्रॉक्स पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावेत. अशाप्रकारे आपण मळके, खराब झालेले क्रॉक्स अगदी मिनिटभरात घरच्याघरीच पुन्हा नव्यासारखे स्वच्छ करु शकतो.


Web Title: how to clean crocs at home easy way to clean crocs crocs cleaning hacks home remedies to clean crocs how to make crocs look new again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.