बदलत्या काळानुसार आपल्या स्वयंपाकघरातील भांडी देखील बदलत जातात. स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी, विशेषत: आधुनिक कुकिंग वेअर ही अशी डिझाइन (How to Clean Copper Vessel) केलेली असतात, ज्यांचा आतला पृष्ठभाग स्टीलचा असतो, पण खालील बेस किंवा काही भाग तांब्याच्या मटेरियलचा बनलेला असतो. हे तांब्याचे पृष्ठभाग केवळ उष्णता जलद शोषून घेत (How to Clean Copper and Prevent Future Tarnishing) नाहीत, तर दिसायलाही खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. परंतु, जसजसा त्यांचा वापर वाढत जातो, तसे उष्णता, पाणी आणि अॅसिडिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे तांब्याच्या पृष्ठभागावर काळपटपणा येतो(cleaning the copper vessel with available items in the kitchen).
तांब्याचे हे भाग ऑक्सिडाइज होऊन काळवंडतात, ज्यामुळे भांडी खराब दिसू लागतात आणि त्यांची नैसर्गिक चमक नाहीशी होते. ही भांडी आतून स्टीलची असल्याने त्यांना नेहमीच्या डिटर्जंटने साफ करणे सोपे असते, पण या तांब्याच्या पृष्ठभागाला पुन्हा नव्यासारखे आणि चमकदार करणे थोडे कठीण असते.आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून, या तांब्याच्या पृष्ठभागावरील काळपटपणा, डाग आणि तेलकटपणा कसा दूर करायचा, याची जादुई आणि सोपी ट्रिक पाहूयात. आपल्या स्वयंपाकघरातील तांब्याचा पृष्ठभाग असलेल्या भांड्यांना पुन्हा पहिल्यासारखी चमक आणण्यासाठी घरच्याघरीच करता येईल असा सोपा उपाय पाहा...
किचनमधील काही भांड्यांचा पृष्ठभाग तांब्याचा असतो, अशी भांडी स्वच्छ करण्याची ट्रिक...
आपल्या स्वयंपाकघरात अनेक भांडी अशी असतात ज्यांचे आतले किंवा बाहेरचे पृष्ठभाग तांब्याचे (Copper coated) असतात, पण मूळ भांडं स्टीलचं असतं. अशा भांड्यांचा वापर जास्त केल्यामुळे त्यावरील तांब्याचा थर काळपट होतो, डाग पडतात आणि भांड्यांचा चमकदारपणा पूर्णपणे निघून जातो. परंतु हे तांब्याचे काळपट पृष्ठभाग पुन्हा चमकदार करण्यासाठी इंस्टाग्रामवरील editz_xzf या अकाउंटवरुन एक घरगुती उपाय शेअर करण्यात आला आहे.
गॅस-ॲसिडीटी सतावते झोपेचं होत खोबरं? 'या' पोझिशनमध्ये झोपा, गॅसचा त्रास होईल मिनिटांत कमी...
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ पिकलेलं केळं, १ टेबलस्पून टूथपेस्ट आणि १/२ वाटी कोणतेही कोल्डड्रिंक इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एका बाऊलमध्ये, पिकलेलं केळं मॅश करुन त्यात टूथपेस्ट घाला आणि हे मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्रित कालवून घ्या. त्यानंतर या मिश्रणात थोडे कोल्डड्रिंक घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
आता हे तयार मिश्रण भांडी घासण्याच्या स्क्रबरने किंवा घासणीने, तांब्यांचा पृष्ठभाग असलेल्या भांड्यांवर लावून घ्यावे. मग स्क्रबरने घासून भांडं स्वच्छ घासून घ्यावे. त्यानंतर भांडं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आपण मग या भांड्यात फरक पाहू शकता. काळीकुट्ट तांब्याचे पृष्ठभाग असलेली भांडी आपण अशाप्रकारे मिनिटभरात स्वच्छ करु शकतो. ही ट्रिक तांब्याचे पृष्ठभाग असलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे.