Join us

तांब्या-पितळाची भांडी काळी पडली? घरातले 3 पदार्थ लावा, गणपतीत लखलखीत, स्वच्छ दिसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:44 IST

How To Clean Copper Utensils : वापरल्यानंतर भांडी पुसून, कोरड्या ठिकाणी ठेवा, दीर्घकाळ ठेवायची असल्यास आतमध्ये कापड किंवा पेपर टाका.

तांब्याची भांडी आणि पितळाची भांडी दिसायला खूपच सुंदर असतात आणि आकर्षकही दिसतात. तांब्याच्या भांड्याचे बरेच प्रकार आहेत. (Home Hacks) रोज वापर करताना त्यांची चमक कायम ठेवणं कठीण होतं. गौरी-गणपती येण्याआधी ही भांडी स्वच्छ करायची असतील तर तुम्ही काही खास उपाय करू शकता. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात ही भांडी धुवून होतील. (How To Clean Copper Utensils)

मीठ आणि लिंबानं साफ करा

तांब्याचा काळेपणा कमी करण्यासाठी आणि भांडी चमकवण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी मिठात लिंबाचा रस मिसळा आणि भांड्यांना अर्धा तास लावून ठेवा. मीठ आणि लिंबाचे मिश्रण या भांड्यांवरचा काळपट थर काढते ज्यामुळे डागही सहज नाहीसे होतात. जवळपास ५ मिनिटं ही भांडी रगडून स्वच्छ पाण्यानं साफ करून घ्या.

व्हिनेगरनं तांब्याच्या भांड्याची सफाई

व्हिनेगरनं तांब्याच्या भांड्यांची स्वच्छता करणं खूपच सोपं आहे. यासाठी व्हिनेगरमध्ये तांब्याची भांडी भिजवून ठेवा. नंतर काहीवेळानं हातानं किंवा ब्रशच्या साहाय्यानं भांडी स्वच्छ करा. या उपायानं भांड्यांवर नवीन चमक येईल.

रोज भरपूर चालूनही सुटलेलं पोट तसंच गोलमटोल? कारण चुकलेली चाल, पाहा ‘चालण्याची’ योग्य पद्धत

बेकींग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर करून तु्म्ही भांडी स्वच्छ करू शकता. बेकिंग सोड्यात लिंबाचा रस आणि पाणी मिसळा नंतर भांड्यांवर लावा. थोडावेळ तसंच ठेवल्यानंतर धुवून स्वच्छ करा,नंतर थंड पाण्यानं धुवून घ्या. तांब्याची भांडी या उपायानं स्वच्छ होतील.

भांडी धुतल्यानंतर नेहमी कोरडी करा, ओली राहिली तर पुन्हा काळपट होतात. स्टीलचा खरवडणारा स्क्रबर वापरू नका, त्याने ओरखडे पडतात. तांब्याची भांडी रोज धुण्याची गरज नाही, आठवड्यातून १-२ वेळा या पद्धती वापरल्या तरी पुरेसे आहे. कोमट पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसा. दीर्घकाळ वापरणार नसाल तर भांडी पुसून ठेवताना आतमध्ये कोरडं कापड टाकलं तर ओलावा धरत नाही.

कितीही घासा, टॉयलेटचे पिवळे डाग निघत नाही? ३ गोष्टी करा, नव्यासारखं लख्खं चमकेल टॉयलेट

तुम्ही ही भांडी प्लास्टीकच्या पिशवीत बांधूनही ठेवू शकता, वापरल्यानंतर भांडी पुसून, कोरड्या ठिकाणी ठेवा, दीर्घकाळ ठेवायची असल्यास आतमध्ये कापड किंवा पेपर टाका. तेलकटपणा निघण्यासाठी बेसन किंवा दही लावून घासल्यास तेलकट थर निघून जातो. भांडी धुण्यासाठी कोमट किंवा उकळत्या पाण्याचा वापर करा. कधी कधी भांडे उकळत्या पाण्यात २-३ मिनिटं टाकून काढा.

टॅग्स :स्वच्छता टिप्स