प्रत्येक घरातील किचनमध्ये स्टिल, काचेच्या भांड्यांबरोबरच तांब्या, पितळाची भांडीसुद्धा असतात. तांब्याच्या भांड्यांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी करू शकता. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं किंवा जेवण करणं हेल्दी मानलं जातं. गावांत आणि छोट्या शहरांमध्ये आजही लोक या भांड्यांचा वापर करतात. साफ सफाई करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Tips And Tricks 5 Easy Tricks To Clean Copper Utensils At Home By Using Baking Soda Lemon White Vinegar)
एका वाटीत लिंबाचा रस काढून घ्या. तुम्हाला किती भांडी स्वच्छ करायची आहेत. याचं प्रमाण लक्षात घेऊन लिंबाचा रस वाटीत काढा. नंतर त्यात 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 2 चमचे व्हिनेगर आणि 4 ते 5 थेंब डिश वॉश लिक्विड घ्या. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. (Easy Ways to clean copper utensils at home)
संक्रातीला दारापुढे ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या; पतंग- तीळगुळाच्या चित्रांनी सजवा दार
तुमच्याकडे असलेल्या तांब्याच्या भांड्यांना ब्रशच्या साहाय्याने हे लिक्विड लावा. नंतर पाणी घालून हे धुवून घ्या धुतल्यानंतर भांडी चकचकीत दिसू लागतील. लहान भांडी असतील तर तुम्ही थेट या द्रावणात बुडवू शकता. ज्यामुळे भांड्यांवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल.
इतर उपाय
एक मोठा चमचा मीठ आणि १ कप व्हाईट व्हिनेगर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर मऊ कापडाला हे मिश्रण लावून तांब्याची भांडी स्वच्छ करा. नंतर पाण्यानं क्लिन करा. रोज तांब्यांच्या भांड्यांचा वापर करण्याऐवजी आठवड्यातून २ वेळा साफ करा.
'...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र
चिंचेच्या साहाय्यानंही तुम्ही तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता. चिंच पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर पाण्यात व्यवस्थित कुस्करून घ्या. हे पाणी भांड्यांवर रगडा आणि ५ ते ७ मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर पाण्यानं स्वच्छ करा. तांब्याची भांडी तुम्हाला स्वच्छ साफ झालेली दिसून येतील. रात्रभर तांब्याच्या भांड्यांना साबण किंवा डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवून तसंच ठेवा. सकाळी रगडून ही भांडी साफ करा. ज्यामुळे भांडी साफ झालेली दिसून येतील.