वसंत ऋतु आला की, सणांची देखील रेलचेल सुरु होते. अशावेळी हमखास तळणीचे पदार्थ आपण करतो. (How to Filter Used Cooking Oil) होळीचा सण लवकरच येईल या काळात आपण मिठाई, करंजी, शंकरपाळी, पुरी, पापड किंवा भजी यांसारखे तळलेले पदार्थ आपण बनवतो. (Best Ways to Clean Frying Oil)
परंतु, यावेळी तेलात तळलेल्या पदार्थाचे दाणे राहातात. हे तेल ठेवणे किंवा फेकून देणे शक्य होत नाही. (Kitchen Hacks for Reusing Cooking Oil)पण काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपल्याला हे तेल स्वच्छ करता येते. तसेच हे तेल आपल्याला पुन्हा वापरता येईल. हे तेल स्वच्छ करण्यासाठी जाणून घेऊया सोपी पद्धत. (Best Way to Clean Oil After Frying Puri)
बाथरुमधल्या बादल्या-मगवर काळे-पिवळे थर जमा झाले? ३ सोपे उपाय, नवीन दिसतील ५ मिनिटात
तळलेले तेल साफ करण्याची सोपी पद्धत
सर्वात आधी तळलेले तेल किंवा तूप मंच आचेवर गरम करा. एका भांड्यात १ ते २ चमचा कॉर्नस्टार्च घ्या.त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गरम तेलात घालून हळूहळू ढवळा. काही मिनिटांतच तेलातील सर्व घाण कॉर्नस्टार्चला चिकटेल. आताहे मिश्रण गाळून घ्या. तेलातील सर्व घाण निघून ते स्वच्छ झाले असेल. तसेच रंग पूर्वीपेक्षा चांगला दिसेल. तेलाला थंड करुन वापरु शकता.
तेलाचा पुनर्वापर करताना
1. तळलेले तेल पुन्हा वापरु नका.आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
2. तेल जळाले असेल आणि त्यातून वास येत असेल तर स्वच्छ केल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करु नका.
3. भाज्या किंवा इतर पदार्थ तळण्यासाठी या तेलाचा पुन्हा वापर करु नका.
तेलाचा वापर कसा कराल?
1. तळलेल्या तेलाचा पुन्हा वापर करायचा असेल तर स्वयंपाकघरात वापरण्याऐवजी आपण इतर घरगुती गोष्टीसाठी वापर करु शकतो.
2. या तेलाचा वापर आपण दिवा किंवा पणती लावण्यासाठी करु शकतो. तसेच दरवाजा किंवा खिळ्यांसाठी तेल वापरु शकता. ज्यामुळे दरवाजा किंवा लोखंडी वस्तू गंजणार नाही.
3. घराजवळ वनस्पती असतील किंवा बागकामासाठी या तेलाचा वापर करु शकतो. हे तेल कोणत्याही झाडाजवळ असलेल्या भांड्यात ठेवा ज्यामुळे कीटक येणारं नाही.