उन्हाळा सुरु झाला की, फ्रीजच्या पाण्यापेक्षा मातीच्या माठातल्या गारेगार पाण्याची ओढ आपल्या प्रत्येकाला लागते. माठातील पाणी हे फक्त नैसर्गिकरित्या थंड नसतं, तर ते आरोग्यासाठी देखील उत्तम मानलं जातं.(How to clean clay pot for water) पण ज्या माठातून आपण रोज पाणी पितो तो आतून किती स्वच्छ आहे याचा आपण कधी विचार केला का? अनेकदा आपण फक्त वरवर माठ विसळून त्यात पाणी भरतो. पण हीच एक सवय आपल्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. (Math kasha swachh karava)उन्हाळ्यात उष्णतेमुळे माठाच्या तळाशी शेवाळ किंवा बारीक अळ्या जमा होतात. जर आपण रोजच्या रोज माठ व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ केला नाही तर त्यातील दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या किंवा पोटाचे गंभीर विकार जडू शकतात.(Clay pot cleaning tips for summer) आपण माठ स्वच्छ करताना अशा काही चुका करतो ज्या आपल्याला कळतही नाहीत. म्हणूनच, 'आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीप्रमाणे, माठातलं पाणी भरण्यापूर्वी त्याची योग्य पद्धतीने स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे. 2 मिनिटांत माठ स्वच्छ कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायला हव्या पाहूयात.
माठ स्वच्छ करताना ३ चुका टाळा
1. माठ स्वच्छ करण्यासाठी कधीही भांड्याचा साबण किंवा लिक्विड वापरु नका. मातीमध्ये शोषून घेण्याची क्षमता असते. साबणाचे अंशा मातीच्या छिद्रात अडकून राहतात आणि तेच रासायनिक पाणी आपल्या पोटात जाते.
2. माठ आतून घासताना लोखंडी घासणीचा वापर करु नका. यामुळे मातीचा थर निघतो आणि माठ लवकर गळण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते.
3. माठ स्वच्छ धुवून घेतल्यावर तो कडक उन्हात ठेवू नका. तापमानातील फरकामुळे माठाला तडे जाऊ शकतात.
माठ साफ करण्याची पद्धत
1. माठ धुताना त्यात थोडे जाडे मीठ आणि कोमट पाणी घाला. मीठ हे नैसर्गिक सॅनिटायझर म्हणून काम करते आणि तळाशी साचलेली घाण काढून टाकते.
2. जर माठाला वास किंवा दुर्गंधी येत असेल तर लिंबाच्या सालीने माठ आतून हलक्या हाताने घासा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पाणी ताजे राहते.
3. माठच्या बाहेरील आवरणाला पांढरे डाग लागले असतील तर कापडाने पुसून काढा. हे छिद्र मोकळे राहिल्यावर पाण्याचे बाष्पीभवन नीट होते, ज्यामुळे आतील पाणी गारेगार होते.
4. दर तीन ते चार दिवसांनी माठ पूर्णपणे रिकामा करुन तो घासून पुसून वाळवून मगच तो पुन्हा भरावा. जुन्या पाण्याचा साठा तळाशी राहू देऊ नका. यामुळे शेवाळ साचू शकते.
Web Summary : Keep your clay pot clean for cool, healthy water this summer. Avoid soap, harsh scrubbers, and direct sunlight. Use salt, lemon, and regular cleaning to prevent contamination.
Web Summary : गर्मी में ठंडे और स्वस्थ पानी के लिए मिट्टी के घड़े को साफ रखें। साबुन, कठोर स्क्रब और सीधी धूप से बचें। संदूषण रोकने के लिए नमक, नींबू और नियमित सफाई का उपयोग करें।