Lokmat Sakhi >Social Viral > पाहा लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत - १ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

पाहा लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत - १ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

How to clean chakla belan at home : clean wooden chakla belan : chakla belan cleaning tips : kitchen hacks for cleaning chakla, belan : how to remove dough stains from chakla & belan : wooden rolling pin cleaning : लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची पाहा एक खास घरगुती ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 09:45 IST2025-08-14T09:40:00+5:302025-08-14T09:45:01+5:30

How to clean chakla belan at home : clean wooden chakla belan : chakla belan cleaning tips : kitchen hacks for cleaning chakla, belan : how to remove dough stains from chakla & belan : wooden rolling pin cleaning : लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची पाहा एक खास घरगुती ट्रिक...

How to clean chakla belan at home clean wooden chakla belan chakla belan cleaning tips wooden rolling pin cleaning how to remove dough stains from chakla & belan | पाहा लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत - १ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

पाहा लाकडी पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत - १ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

स्वयंपाक घरातील काही भांडी ही हमखास रोज वापरली जातात, पोळपाट - लाटणं हे त्यापैकीच एक. दररोज चपात्या करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ असे  दिवसातून किमान दोन वेळा (How to clean chakla belan at home) तरी पोळपाट लाटण्याचा वापर केला जातो. पोळपाट - लाटण्याचा वापरही दररोज होत असल्याने त्याच्या स्वच्छतेची देखील तितकीच काळजी घेणं गरजेचे असते. दररोज या पोळपाट - लाटण्याचा वापर करुन चपात्या केल्यास ते नक्कीच रोजच्या (clean wooden chakla belan) वापराने खराब होते. पोळपाट लाटण्यावर अनेकदा कणीक चिकटते, कोरडं पीठ (chakla belan cleaning tips) देखील चिकटून बसते. हीच क्रिया दररोज होत असल्याने एका ठराविक विशिष्ट काळानंतर पोळपाट - लाटणं खराब होऊ लागतं. जर पोळपाट - लाटणं वेळीच लक्ष देऊन स्वच्छ केलं नाही तर त्यावर चिकटपणा, डाग आणि बॅक्टेरिया साचू लागतात. ज्यामुळे पोळपाट - लाटणं खराब होण्याची शक्यता वाढते, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते(how to remove dough stains from chakla & belan).

प्रत्येक गृहिणीसाठी स्वयंपाकघरातील पोळपाट-लाटणं हे महत्त्वाचं आणि रोजच्या वापरातील असतं. पोळ्या, पराठे किंवा इतर पदार्थ तयार करण्यासाठी ते नेहमीच लागतं. पण वापरानंतर ते व्यवस्थित स्वच्छ न केल्यास ते खराब होऊ लागतं. बऱ्याचदा, पोळपाट-लाटणं नुसतं पाण्याने धुवून ठेवलं जातं, तर कधी साबण किंवा लिक्विड सोपचा वापर केला जातो पण त्यामुळे ते पूर्णपणे स्वच्छ होत नाही. जर तुम्हालाही पोळपाट-लाटणं अगदी नवीन असल्यासारखं चमकावायचं असेल, तर काही खास ट्रिक्स आहेत. या काही खास, सोप्या आणि असरदार टिप्सच्या मदतीने आपण पोळपाट-लाटणं अगदी कमी वेळात आणि फारसे कष्ट न घेता देखील सहज स्वच्छ करू शकतो. यासाठी, नेमकं काय करायचं ते पाहा...  

१. लाकडी पोळपाट - लाटणं वेगळ्या पद्धतीने का स्वच्छ करावं ?

लाकडी पोळपाट - लाटणं स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तूप्रमाणे डिश सोप किंवा साबणाने धुणे नेहमीच योग्य नाही, कारण लाकूड जास्त पाणी शोषून घेते. यामुळे पोळपाट - लाटण्याला तडे जाऊ शकतात किंवा त्याला कुबट वास येऊ शकतो. म्हणूनच, पोळपाट - लाटणं स्वच्छ करण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक पद्धती वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते. 

खीर केली, करपून गेली? घाबरु नका-घ्या ६ टिप्स, खिरीचा जळका वास होईल गायब... 

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

२. पोळपाट - लाटणं कसं  स्वच्छ करावं याची भन्नाट ट्रिक्स... 

१. गरम पाण्याने पुसा :- पोळपाट लाटणे हलक्या गरम पाण्याच्या ओल्या कपड्याने पुसून घ्या, जेणेकरून त्याचा पृष्ठभाग थोडा ओलसर होईल.

२. मीठ टाका :- लाटण्यावर जाड मीठ किंवा साधे मीठ व्यवस्थित पसरवून टाका. 

३. लिंबू घासा :- अर्धा लिंबू घेऊन गोलाकार फिरवत पोळपाट - लाटण्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर घासून घ्या. लिंबातील सायट्रिक ऍसिड (citric acid) आणि मिठाचा खरखरीतपणा यामुळे लाटण्याला चिकटलेले पीठ आणि डाग निघून जातात.

४. गरम पाण्याने पुसा :- घासून झाल्यावर लाटणे फक्त गरम पाण्याच्या ओल्या कपड्याने पुसून घ्या, ते थेट पाण्यात बुडवून ठेवू नका.

५. सुकायला ठेवा :- लाटणे लगेचच कोरड्या कपड्याने पुसा आणि नंतर हवेशीर ठिकाणी सुकायला ठेवा, जेणेकरून त्यात ओलावा राहणार नाही. 

आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय-टाळा केमिकल...

३. स्वच्छतेनंतर काय करावे?

लाकडी भांड्यांचा (wooden utensils) टिकाऊपणा वाढवण्यासाठी, स्वच्छतेनंतर त्यांच्यावर नारळाचे तेल किंवा मिनरल ऑइलचा (mineral oil) पातळ थर लावा. यामुळे लाकडातील ओलावा टिकून राहतो आणि ते दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहते.

लाकडी लाटणे जर योग्य पद्धतीने स्वच्छ केले, तर ते अनेक वर्षे टिकते आणि नवीन असल्यासारखे दिसते. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला हा सोपा उपाय केवळ सोयीचाच नाही, तर सुरक्षितही आहे. त्यामुळे, पुढच्या वेळी लाटण्याला पीठ चिकटले तर, मीठ, लिंबू आणि गरम पाण्याचा हा जादुई उपाय नक्की वापरून पाहा.



   

Web Title: How to clean chakla belan at home clean wooden chakla belan chakla belan cleaning tips wooden rolling pin cleaning how to remove dough stains from chakla & belan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.