ऊन्हाळा सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसांत कमी वेळ चालणारा पंखा आता प्रत्येक घरात चोविस तास सुरू राहतो. पंखा सुरू नसेल तर अस्वस्थ व्हायला होतं. पंखा व्यवस्थित चालत नसेल तर हवासुद्धा कमी येते. वारंवार वापरल्यामुळे पंख्याच्या पात्यांवर धूळ साचते. ही धूळ सहजासहजी साफ होत नाही. कमी मेहनतीत पंखा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. सिलिंग फॅन स्वच्छ करण्याचं कठीण काम सोपं होण्यास मदत होईल. काही मिनिटांत सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (Ceiling Fan Cleaning Hacks)
उशीचे कव्हर
पंख्याच्या पात्यांवर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जुन्या उशीच्या कव्हर्सचा वापर करू शकता. यासाठी कव्हर पंख्याच्या ब्लेडवर घाला. हळूहळू बाहेरच्या बाजूनं खेचा. यामुळे सर्व धूळ कव्हरच्या आत जमा होईल. पंखा किंवा बेड किंवा सोफ्यावर लावा. ज्यामुळे पंखा स्वच्छ होईल.
क्लिनिंग डस्टर
तर तुम्ही खुर्ची, टेबलचा वापर न करता पंखा स्वच्छ करू इच्छित असाल तर क्लिनिंग डस्टरचा वापर करू शकता. ज्यामुळे घाण निघून जाण्यास मदत होईल. यासाठी सगळ्यात आधी बादलीत व्हिनेगर, पाणी आणि डिटर्जेंट मिसळून द्रावण तयार करा. यात डस्टर भिजवून पिळून पंखा स्वच्छ करा. या उपायानं पंखा कमी वेळेत चकचकीत दिसेल.
व्हिनेगर आणि पाणी
पंख्यावर धूळ आणि जास्त प्रमाणात चिकटपणा जमा झाला असेल तर व्हिनेगर आणि पाण्याचं द्रावण तयार करून तु्म्ही पंखा चमकवू शकता. यासाठी व्हिनेगरमध्ये डिटर्जेंट मिसळा. त्यानंतर कमी प्रमाणात पाण्याचं द्रावण घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण पंख्यावर लावा आणि स्क्रबप्रमाणे वापर करा. काही वेळ पंख्यावर लावलेलं राहू द्या. नंतर साध्या पाण्यात कापड बुडवून पंखा स्वच्छ करून घ्या.
लिंबू आणि डिटर्जेंट
पंखा चमकवण्यासाठी लिंबू आणि डिटर्जेंटचा वापर करा. कोमट पाण्यात लिंबू आणि डिटर्जेंट मिसळा. पंखा लवकर साफ होण्यास मदत होईल. एका क्लिनिंग ब्रशला या मिश्रणात बुडवून तुम्ही पंखा सहज स्वच्छ करू शकता.
Web Summary : Summer's here, and fans run constantly. Dust buildup reduces airflow. Easily clean fan blades using pillowcases, cleaning dusters, vinegar, or lemon-detergent solutions. These simple hacks restore cooling efficiency quickly.
Web Summary : गर्मी आ गई है, और पंखे लगातार चलते हैं। धूल जमने से हवा का प्रवाह कम हो जाता है। तकिये के कवर, सफाई डस्टर, सिरका या नींबू-डिटर्जेंट घोल का उपयोग करके पंखे के ब्लेड को आसानी से साफ करें। ये सरल उपाय जल्दी से शीतलन दक्षता बहाल करते हैं।