प्रत्येकाच्या घरी तवा असतो आणि त्यावर चपत्या किंवा भाकऱ्या भाजल्या जातात. जर तुम्ही सतत तव्यावर चपात्या, भाकऱ्या बनवत राहिलात पण तो तवा व्यवस्थित स्वच्छ केला नाहीत तर तवा लवकर खराब होतो. तवा जास्त काळा आणि घाणेरडा दिसू लागतो. अशा परिस्थितीत काळा झालेला तवा कसा चकाचक करायचा, त्यासाठी सोपे उपाय कोणते हे जाणून घेऊया...
कसा स्वच्छ करायचा तवा?
तवा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला ३ गोष्टींची आवश्यकता असेल. या गोष्टी म्हणजे २ ते ३ चमचे मीठ, एक कापलेला लिंबू आणि २ चमचे व्हिनेगर.
सर्वप्रथम तवा मंद आचेवर ठेवा. यानंतर, तव्यावर मीठ टाका. मीठ गरम झाल्यावर अर्धा लिंबू तव्यावर चोळायला सुरुवात करा. यामुळे तव्यावरील घाण स्वच्छ होण्यास सुरुवात होईल. आता लिंबाच्या सालीवर जो काही लिंबाचा रस असेल तो व्हिनेगरमध्ये मिसळा आणि हे मिश्रण तव्यावर ओता. काही वेळनंतर, गॅस बंद करा.
तवा थंड झाल्यानंतर, साबण किंवा लिक्विड सोपने घासून तो पूर्णपणे स्वच्छ करा. तुमचा तवा एकदम चमकेल आणि त्यावर कोणताही चिकटपणा किंवा काळेपणा दिसणार नाही. आजच तुम्ही नवीन तवा घेतल्यासारखा वाटेल.
'या' टिप्स करतील मदत
- तव्यावर चिकटपणा जमा होऊ नये म्हणून तो गरम पाण्याने धुता येतो.
- तव्याला नीट साबण लावा आणि चांगला घासून घ्या, नंतर तो धुवून स्वच्छ करा. पॅन चकाचक होईल.
- व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. त्यात स्पंज बुडवा आणि नंतर पॅन स्वच्छ करा.
- बेकिंग सोडा देखील तवा स्वच्छ करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
- बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तव्यावर लावा आणि काही वेळ ठेवा. थोड्या वेळाने नेहमीच्या पद्धतीने धुवा. तवा पूर्णपणे स्वच्छ होईल.