Join us

भांड्यांवरचे काळे डाग फ्रीजमधील छोट्याशा गोष्टीने पटकन होतात गायब, रेस्टॉरंट्समध्ये वापरतात अशी भन्नाट युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 17:33 IST

काळी झालेली भांडी कशी स्वच्छ करायची असा मोठा प्रश्न पडतो.

जेव्हा घरात एखाद्या भांड्याचा जास्त वापर केला जातो आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिजवले जातात तेव्हा अनेकदा ते भांडे काळं होतं. भांड्याच्या पृष्ठभाग इतका चिकट होतो की साबणाने कितीही घासलं तरी भांडी स्वच्छ होत नाहीत. अशा परिस्थितीत काळी झालेली भांडी कशी स्वच्छ करायची असा मोठा प्रश्न पडतो. रेस्टॉरंट्समध्ये काळी पडलेली भांडी बर्फाने स्वच्छ करतात. कसं ते जाणून घेऊया...

भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरा बर्फ

भांडी स्वच्छ करण्यासाठीची ही हटके पद्धत इन्स्टाग्रामवर haoqiwanhuatong नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. काळं पडलेलं भांडं स्वच्छ करण्यासाठी त्यावर बर्फाचे तुकडे ठेवा आणि ते घासून घ्या, यामुळे भांड्यावरील काळेपणा निघून जाण्यास मदत होईल. भांडं गरम असलं पाहिजे. जेव्हा भांडी बर्फाने स्वच्छ केली जातात तेव्हा उष्णतेमुळे बर्फ वितळू लागेल आणि त्यासोबतच भांड्यांवर चिकटलेले मसाले, चिकटपणा आणि काळेपणा देखील हळूहळू निघून जाईल.

हे हॅक्स ठरतील उपयुक्त 

तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने काळी पडलेली भांडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी भांड्यात समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर टाका आणि ते गॅसवर ठेवा. यानंतर भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा घाला. नंतर गॅस बंद करा आणि १५ मिनिटे असंच राहू द्या. आता पाणी फेकून द्या आणि स्वच्छ कापडाने भांडी पूर्णपणे स्वच्छ करा. काळेपणा निघू लागेल.

भांडी स्वच्छ करण्यासाठीही लिंबाचे तुकडे उपयुक्त आहेत. यासाठी एका भांड्यात २ ते ३ लिंबाचे तुकडे ठेवा, त्यात थोडे पाणी घाला आणि भांडं गॅसवर ठेवा. लिंबू थोडेसा बुडेल एवढेच पाणी घाला. काही वेळाने भांडे साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. डाग निघून जातील.

भांड्यावर गरम पाणी ओता आणि नंतर पाणी काढून टाका. आता या ओल्या भांड्यावर बेकिंग सोडा टाका आणि काही वेळ ठेवा. यानंतर अॅल्युमिनियम फॉइलने भांडं घासण्यास सुरुवात करा. यामुळे भांड्यावरील काळेपणा निघून जाईल आणि भांडं स्वच्छ दिसू लागेल.

 

टॅग्स :व्हायरल व्हिडिओअन्न