आपल्या सगळ्यांच्याच घरात लोखंडी तवा, पॅन,कढई असतेच. लोखंडी भांडी खरंतर, वर्षानुवर्षे अत्यंत चांगली टिकतात तसेच अशा भांड्यात पदार्थ देखील अत्यंत चांगले होतात. स्वयंपाकघरातील लोखंडी (how to clean burnt iron kadai) तवे, पॅन आणि कढई स्वयंपाकात जितके उपयुक्त, तितकेच स्वच्छ ठेवणंही गरजेचं असतं. लोखंडी भांडी वापरणे जितके सोपे तितकेच स्वच्छ ठेवणे अवघड असते( best way to clean iron tawa at home).
लोखंडी भांडी शक्यतो वापरल्याने त्यावर काळपट, चिकट असा थर जमा होतो, जो स्वच्छ करणे कठीण जाते. परंतु या लोखंडी भांड्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे देखील तितकेच आवश्यक असते. लोखंडी भांड्यांवरील काळसर थर साफ न केल्यास ही भांडी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. यासाठीच, घरातील लोखंडी भांडी स्वच्छ ( home remedy for cleaning iron pans) करण्यासाठी आपण एक खास घरगुती उपाय करुन पाहू शकतो. स्वयंपाक घरातील लोखंडी भांडी स्वच्छ करण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन मिनिटभरात ही लोखंडी भांडी कशी स्वच्छ करु शकतो ते पाहा.
लोखंडी भांडी स्वच्छ करण्यासाठी उपाय काय आहे ?
घरातील लोखंडी भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण स्वयंपाक घरातीलच पदार्थांचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला मीठ, लिंबाचा रस, बेकिंग सोडा इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कढई - तव्याच्या कडेला साचला काळाकुट्ट थर? १ भन्नाट ट्रिक - न घासताच होईल मिनिटांत चकाचक...
काचेचे कप फुटतात, तडे जातात? करा १ काम - वर्षानुवर्षे कप न फुटता राहतील नव्यासारखे...
आता ही लोखंडी भांडी स्वच्छ करायची कशी ?
लोखंडी भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात, मीठ व बेकिंग सोडा सम प्रमाणांत घालूंन द्रावण तयार करून घ्यावे. त्यानंतर, लोखंडी पॅन, कढई, तवा जे भांडं आपल्याला स्वच्छ करायचं आहे ते गॅसच्या मंद आचेवर आधी गरम करून घ्यावं. त्यानंतर तयार द्रावण गरम भांड्यात ओतून स्क्रबरच्या मदतीने घासून लोखंडी भांडी स्वच्छ करावीत.
पेस्ट कंट्रोल करुनही ढेकूण जात नाहीत? खिशाला परवडेल असा जालीम उपाय - ढेकूण परत होणारच नाही!
हा साधासोपा घरगुती उपाय केल्याने लोखंडी भांड्यांवरील साचलेला काळाकुट्ट थर आणि तेलकटपणा अगदी सहज काढता येतो. या उपायामुळे लोखंडी भांडी स्वच्छ होऊन पुन्हा पहिल्यासारखी चमकू लागतील.