Join us  

How to Clean Burners Gas: कळकट, डाग पडलेलं गॅस बर्नर ५ मिनिटात होईल स्वच्छ, चमकेल चकाचक! पाहा व्हिडिओ- नवी ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:35 AM

How to Clean Burners Gas : . गॅस बर्नर स्वच्छ करणं अवघड वाटत असलं तरी एकदम सोपं काम आहे.

किचन कितीही आवरलं तरीही कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात पसारा दिसतोच.  रोज दिवसाच्या शेवटी अनेकजण शेगडी ओटा स्वच्छ करून मगच झोपतात पण गॅस बर्नरमध्ये अडकलेली घाण तशीच राहते. गॅस बर्नर स्वच्छ करणं अवघड वाटत असलं तरी एकदम सोपं काम आहे. या लेखात गॅस बर्नर स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया. (What is the easiest way to clean gas burners)

उपाय १

सर्व प्रथम, आपल्याला एका भांड्यात गरम पाणी घ्या. यानंतर तुम्ही Eno पाण्यात टाका. बर्नरला Eno च्या पाण्यात  ठेवा  15 मिनिटे ठेवा. 15 मिनिटांनंतर तुमचे बर्नर सर्व स्वच्छ होतील. जर तुम्ही गॅस बर्नर दर 15 दिवसांनी स्वच्छ केला तर तुम्हाला त्यावर ब्रश फिरवण्याचीही गरज भासणार नाही.

नादच खुळा! शेणापासून चपला, नेमप्लेट बनवल्या अन् लखपती झाला, महिलांनाही दिला रोजगार

उपाय २ 

एक लहान वाडगा घ्या. नंतर त्यात एक कप गरम पाणी टाका आणि त्यात 1-2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि मिक्स करा. या पाण्यात बर्नर काही मिनिटे भिजवू द्या. नंतर धुऊन झाल्यावर स्वच्छ कापडाने स्वच्छ करा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया