स्वयंपाकघरात कढईचा वापर हा मागच्या कित्येक काळापासून केला जात आहे. लोखंडी, अॅल्युमिनियम, स्टील किंवा नॉन-स्टिकसारख्या कढईचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.(Clean kadhai naturally) तळण्यासाठी, भाजीसाठी किंवा एखादा टेस्टी पदार्थ बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर हमखास होतो. पण अनेकदा तळल्यानंतर कढईला भाज्या तळाशी चिकटून राहतात.(Orange peel cleaning hack)
आठवी-नववीतच मुलामुलींचे केस पांढरे होतात-गळतातही फार? डॉक्टर सांगतात ४ चुका-पालकांसाठी खास सल्ला
तेल आणि तूप साचून राहिल्याने अनेकदा काळी पडते. अनेकदा घासल्यानंतरही ती स्वच्छ करणं कठीण होत. कढई जळाल्यानंतर आपण सहसा ती वापरत नाही किंवा फेकून देतो.(How to clean burnt kadhai) जर आपणही असेच काहीसे करत असाल तर हे ३ सोपे घरगुती उपाय करुन पाहा. (Kitchen cleaning tips)संत्री खाल्ल्यानंतर त्याचं साल बहुतेक वेळा आपण कचऱ्यात फेकतो. पण हेच संत्र्याचं साल आपल्या स्वयंपाकघरातील सगळ्यात मोठी डोकेदुखी दूर करु शकते. रोजच्या वापरातील कढई, तवा किंवा लोखंडी भांडी हळूहळू गंजतात, त्यावर काळा थर पसरतो. कितीही घासलं तरी नव्यासारखी चमकत नाहीत. बाजारात मिळणारे केमिकल क्लिनर वापरले तर भांडी चमकतात पण हातांना खाज, जळजळ आणि आरोग्यालाही धोका निर्माण होतो. अशावेळी संत्र्याचं साल हा एक नैसर्गिक, स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.
1. जळलेल्या तव्यावर किंवा लोखंडी कढईवर संत्र्याच्या साली घासून शकतो. यासाठी आपल्याला २ ते ३ संत्र्याच्या साली घेऊन त्याचा पांढरा भाग तव्यावर घासा. त्यावर वरुन मीठ शिंपडा. मीठ जळलेल्या तव्यावर हलकेच घासा. ५ ते १० मिनिटे घासल्यानंतर कोमट पाणी किंवा डिशवॉशने धुवा. काळेपणा निघून जाण्यास मदत होईल.
2. जळलेला तवा, लोखंडी कढईवरचा गंज काढण्यासाठी त्यात पाणी घाला. नंतर संत्र्याच्या सालीचे ४ ते ५ तुकडे, थोडे मीठ, बेकिंग सोडा घालून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करुन पाणी थंड झाल्यावर स्क्रबरने घासा. तवा, कढई स्वच्छ होण्यास मदत होईल.
3. जर जुनी कढई, पॅन जळालेला असेल तर संत्र्याची साल, व्हिनेगर आणि पाणी घालून उकळवून घ्या. व्हिनेगर आणि सायट्रिक अॅसिड एकत्र आल्यावर काळेपणा लवकर दूर होतो. १० मिनिटे हे पाणी उकळल्यानंतर पॅन स्वच्छ धुवा.
Web Summary : Burnt cookware? Don't discard it! Orange peels, salt, baking soda, or vinegar can restore shine. Boil, scrub, and see the difference!
Web Summary : जला हुआ बर्तन? इसे न फेंके! संतरे के छिलके, नमक, बेकिंग सोडा या सिरका चमक बहाल कर सकते हैं। उबालें, रगड़ें और फर्क देखें!