स्वयंपाक घरातील काही भांडी अशी असतात की जी अगदी दररोज हमखास वापरली जातात. या भांड्यांमध्ये कढई आणि तव्याचा वापर रोज केलाच जातो. चपात्या, भाकऱ्या करण्यासाठी तवा तर भाज्या, आमटी किंवा तळणीचे पदार्थ तयार करण्यासाठी कढई वापरली जाते. स्वयंपाकघरात रोजच्या (how to clean black layer on kadai) उपयोगामुळे कढई, तवा किंवा इतर भांड्यांच्या कडेवर (clean kadai with home remedies) एक प्रकारचा काळसर थर जमा होतो, जो धुतानाही सहज निघत नाही. रोजचा स्वयंपाक, भरपूर तेल आणि उष्णता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तवा, कढईच्या कडेवर (remove burnt layer from kadai) चढलेला काळा, चिकट थर! कितीही घासला, तरी हा हट्टी काळा थर काही केल्या निघत नाही. हा थर फक्त भांडीच खराब करत नाही, तर त्यात स्वयंपाक करणंही अवघड होत(How To Clean Black Layer On The Sides Of Kadai In Mintues With Easy Trick).
शक्यतो, कढई किंवा तव्याच्या कडेला असणारा हा काळाकुट्ट चिकट थर भांडी हातात घेतली तरी खडबडीत आणि चिकट लागतोच. असा काळाकुट्ट तवा, कढई पाहून अनेक गृहिणींना वाटत की काय करावं जेणेकरुन भांडी पुन्हा नव्यासारखी स्वच्छ दिसतील. यासाठीच, आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात कढई, तव्याच्या कडेवर चढलेला काळा, चिकट थर अगदी सहजपणे काढू शकतो. कढई, तव्याच्या कडेवर साचलेला काळा, चिकट थर काढण्यासाठी घरगुती उपाय करताना नेमकं काय करायचं ते पाहा..
कढई, तव्याच्या कडेवर चढलेला काळा, चिकट थर काढण्यासाठी...
कढई, तव्याच्या कडेवर चढलेला काळा, चिकट थर निघता निघत नाही. अशावेळी घरगुती उपायाच्या मदतीने आपण कढई, तव्याच्या कडेवरील काळा, चिकट थर सहज काढू शकतो. यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, २ ते ३ लिंबाचा रस, लिंबाच्या साली, मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तूप रवाळ व दाणेदार होणारच! तूप करताना लक्षात ठेवा ५ पारंपरिक खास टिप्स...
उपाय नेमका करायचा काय ?
सगळ्यात आधी कढईत पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. पाण्याला हलकी उकळी आल्यावर त्यात डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, लिंबाचा रस, लिंबाच्या साली, मीठ असे सगळे साहित्य एकत्रित घालावे. त्यानंतर या पाण्याला पुन्हा हलकी उकळी काढावी. मग गॅस बंद करून स्क्रबर किंवा घासणी याच पाण्यात बुडवून त्या पाण्याने कढईवरील काळा, चिकट थर घासून काढावा.
पेस्ट कंट्रोल करुनही ढेकूण जात नाहीत? खिशाला परवडेल असा जालीम उपाय - ढेकूण परत होणारच नाही!
बेकिंग सोडा चिकट, काळे डाग मऊ करतो आणि डीप क्लीनिंगमध्ये मदत करतो. लिंबात असलेलं सायट्रिक अॅसिड काळसर थर हटवण्यात उपयोगी असतं. लिंबाच्या सालीत नैसर्गिक तेलं असत, जे चिकट घाण सोडवण्यासाठी मदत करते. मीठ नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतं आणि घासताना काळे डाग काढण्यास फायदेशीर ठरतं.