Lokmat Sakhi >Social Viral > गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- खसाखसा न घासता मिनिटांत होई साफ

गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- खसाखसा न घासता मिनिटांत होई साफ

kitchen chimney cleaning : gas chimney cleaning tips: clean greasy chimney: गॅस चिमणी काळी झाली असेल तर या टिप्स फॉलो करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2025 17:52 IST2025-09-08T17:12:55+5:302025-09-08T17:52:19+5:30

kitchen chimney cleaning : gas chimney cleaning tips: clean greasy chimney: गॅस चिमणी काळी झाली असेल तर या टिप्स फॉलो करा

how to clean black and greasy kitchen chimney at home best home remedy to clean chimney without scrubbing easy way to remove oil and grease from gas | गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- खसाखसा न घासता मिनिटांत होई साफ

गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- खसाखसा न घासता मिनिटांत होई साफ

घर कितीही स्वच्छ ठेवलं तर स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या नेहमी त्रासदायक ठरतात.(kitchen chimney cleaning) आपण घरातील अनेक वस्तूंची वारंवार साफसफाई करत असतो. किचनचा ओटा, सिंक, फ्रीज किंवा गॅसची शेगडी.(gas chimney cleaning tips) पण गॅसच्या चिमणीकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. रोजच्या स्वयंपाकात उडणारे तेलाचे कण, मसाल्यांचा वास, धूर यामुळे चिमणीचं सौंदर्य खराब होतं.(clean greasy chimney) ज्यामुळे ती काळे पडते. यावर डाग पडतात, ते डाग इतके हट्टी होतात की कितीही घासले तरी जात नाहीत. मग अशावेळी आपण महागडे लिक्विड वापरतो, पण काही केल्या हट्टी आणि चिकट डाग जात नाही.
यामुळे अनेकदा आपल्याला त्रास होतो. यावर साचलेली घाण आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते. किचनमध्ये उडणारा धूर व्यवस्थित बाहेर न गेल्यामुळे , फिल्टर जाम झाल्याने किंवा स्वयंपाक करताना तेलकट वास येतो.(home remedy for chimney cleaning) अशावेळी उपाय काय? रोज साफ करण खरंतर जमत नाही.  जर आपणही या समस्येपासून त्रस्त असू तर साफ करण्यासाठी काही घरगुती उपाय करुन पाहा. (easy chimney cleaning method)

खराब झालं तरी फेकू नका फ्रीजमध्ये साठवलेले बटर, ५ पद्धतीने वापरा, घर राहिल साफ - स्वच्छ

अनेक गृहिणींना याचा दररोज त्रास होतो. चिमणी नुसती तेलकट दिसते असं नाही तर त्यावर जमा झालेला मळ आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. किचनमध्ये उडणारा धूर व्यवस्थित बाहेर न जाणं, फिल्टर जाम होणं, किंवा स्वयंपाक करताना पुन्हा तेलकट वास येणं – हे सगळं गॅसच्या चिमणीमुळेच होतं. पण प्रश्न असा की, यावर उपाय काय? रोजच्या कामात तासंतास घासायचं तर शक्य नाही आणि प्रत्येक महिन्याला सर्विसिंग करणं हीसुद्धा खर्चिक गोष्ट ठरते.

सगळ्यात आधी आपल्याला गॅस स्टोव्हवरील चिमणी काढावी लागेल. एका बादलीत पुरेसे पाणी घेऊन त्यात चिमणी फिल्टर बुडेल इतके पाणी घाला. या पाण्यात एक कप बेकिंग सोडा घालून ते चांगले मिसळा. याचे द्रावण तयार होईल.  आता चिमणी फिल्टर बेकिंग सोडा पाण्यात घाला, काही वेळ तसेच राहू द्या. जर फिल्टर खूप घाणेरडा झाला असेल तर २ ते ३ तास तसेच राहू द्या. आता फिल्टर पाण्यातून बाहेर काढून त्यावर डिशवॉश लिक्विड लावा. हलक्या स्क्रबर किंवा स्पंजने फिल्टर घासा. ज्यामुळे घाण साफ होण्यास मदत होईल.  फिल्टर स्वच्छ झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा. आपण स्पंजवर बेकिंग सोडाचे पाणी लावून उरलेली चिमणी स्वच्छ करु शकतो. सुकल्यानंतर फिल्टर पुन्हा बसवा. या पद्धतीने किंवा कोणत्याही प्रयत्नांशिवाय स्वयंपाकघरातील चिमणी स्वच्छ करु शकता. 


Web Title: how to clean black and greasy kitchen chimney at home best home remedy to clean chimney without scrubbing easy way to remove oil and grease from gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.