सण-उत्सवांना सुरूवात झाली असून प्रत्येक घरांत साफसफाई केली जात आहे. रूटीनच्या साफसफाई व्यतिरिक्त घरातील कानाकोपऱ्यातील साफसफाईलाही सुरूवात झाली आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं मिळतात. या उत्पादनांचा वापर करून तुम्ही बाथरूमची स्वच्छता करू शकता. (How To Clean Bathroom With Alum) पण खर्च न करतात अतिशय कमी बजेटमध्ये तुम्हाला घर स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटीच्या वापरानं काळे झालेल्या टाईल्स, फरश्या नव्यासारख्या दिसतील. १० रूपयांच्या तुरटीनं तुम्ही घर स्वच्छ करू शकता. (How To Clean Bathroom With Alum Naturally Yellow Tiles And Wash Basin Will Shining)
तुरटीनं बाथरूम कसं स्वच्छ करायचं?
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी एक तुरटीचा खडा घ्या. नंतर हा तुकडा बारीक करून घ्या. नंतर पाण्यात मिसळून हे तुरटीचं द्रावण १० मिनिटांसाठी उकळवून घ्या. तुम्ही पाणी उकळल्यानंतरही वरून तुरटीची पावडर घालू शकता. यामुळे बाथरूम चकचकीत स्वच्छ होईल. हे द्रावण तुम्हील फ्लश,वॉशबेसिनसाठीही वापरू शकता.
तुरटीनं टाईल्स कशा स्वच्छ होतील?
बाथरूमच्या टाईल्स खूपच घाणेरड्या झालेल्या असतात. टाईल्सचे काठ आणि जॉईंट्सवर जास्त घाण जमा झालेली असते. हे साफ करण्यासाठी खूपच रगडावं लागतं. जेव्हा वॉशरूम क्लिन कराल तेव्हा तुरटीचे मिश्रण टाईल्सवर घाला. नंतर टाईल्स रगडून स्वच्छ करा. यामुळे घाण लगेच साफ होईल. टाईल्स चमकदार दिसतील तुम्ही या मिश्रणात डिटर्जेंटसुद्धा घालू शकता.
टॉयलेट शीटचे काठ स्वच्छ करा
तुरटीनं टॉयलेट शीटचे काठही स्वच्छ करता येतात. यासाठी तुरटीच्या पाण्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जेंट मिसळा नंतर हे मिश्रण डाग असलेल्या ठिकाणी लावा. १० मिनिटांनंतर टॉयलेट क्लिनिंग ब्रशच्या मदतीनं स्वच्छ करा.
1 ते 2 इंच आकाराचे तुरटीचे तुकडे 1 लिटर पाण्यात घालून ते पाणी गरम करा. या गरम पाण्याचे कापड ओले करून बाथरूमच्या टाईल्स आणि फरशी पुसून घ्या. यामुळे फरशीवरील आणि टाईल्सवरील साबणाचे डाग आणि चिकटपणा निघून जातो. तुम्ही तुरटीच्या पाण्यात थोडे डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड सोप मिसळून अधिक प्रभावी मिश्रण तयार करू शकता.