Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेट पिवळट झालंय? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय

बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेट पिवळट झालंय? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय

How to Clean Bathroom Tiles with use of alum : १० रुपयांची तुरटीने करा बाथरूम आणि टॉयलेट चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 05:56 PM2024-05-26T17:56:07+5:302024-05-27T21:00:05+5:30

How to Clean Bathroom Tiles with use of alum : १० रुपयांची तुरटीने करा बाथरूम आणि टॉयलेट चकाचक

How to Clean Bathroom Tiles with use of alum | बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेट पिवळट झालंय? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय

बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेट पिवळट झालंय? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय

आपण पूर्ण घर साफ करतो (Cleaning Tips). पण अनेकदा बाथरूम साफ करणं राहून जातं. बाथरूम साफ करणं म्हणजे कठीण काम. बाथरूमच्या टाईल्सवरचे पिवळट डाग, नळांवरचे पांढरे डाग सहसा घासूनही निघत नाही (Bathroom Tips). साबणाने घासूनही जर पांढरे डाग निघत नसतील तर, तुरटीचा वापर करून पाहा. साबणाचा वापर न करता बाथरूम स्वच्छ होईल. पण तुरटीचा वापर बाथरूम स्वच्छ करण्यासाठी कसा करता येईल? बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ तुरटीच्या वापराने होईल का? तुरटीच्या वापराने कमी मेहनतीत बाथरूम कसे स्वच्छ करावे? पाहूयात(How to Clean Bathroom Tiles with use of alum).

डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

तुरटीने बाथरूम कसे चमकवायचे?

बाथरूममधील टाईल्सचे हट्टी डाग घालवण्यासाठी आपल्याला तुरटी लागेल. यासाठी प्रथम, तुरटी फोडून पावडर तयार करा. एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात तुरटीची पावडर घालून मिक्स करा. हवे असल्यास आपण त्यात डिटर्जंट देखील मिक्स करू शकता. तयार पाणी बाथरूमच्या टाईल्सवर ओता. काही वेळानंतर ब्रशने टाईल्स घासा, आणि पाणी ओतून बाथरूम स्वच्छ करा.

आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस..

टॉयलेट स्वच्छ करा

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीही आपण तुरटीचा वापर करू शकता. यासाठी तुरटीच्या पाण्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिसळा. तयार मिश्रण टॉयलेटच्या डागांवर ओता. १० मिनिटानंतर क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा. यामुळे टॉयलेट स्वच्छ होईल.

Web Title: How to Clean Bathroom Tiles with use of alum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.