Join us
Daily Top 2Weekly Top 5

AC स्वच्छ करण्याची खास ट्रिक! रिमोटचं 'हे' बटन दाबा, सर्व्हिसिंगपूर्वी करुन पाहावा असा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:08 IST

How To Clean Air Conditioner At Home (Which Button Foe AC Cleaning Window) : अनेकदा एसी लावल्यानंतरही व्यवस्थित कुलिंग होत नाही आणि दुर्गंधही येतो.

AC Cleaning Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत (Summer 2026) वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक घरांत एसी लवतात पण कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण सतत वापरत असताना त्याची काळजीसुद्धा घ्यावी लागते अन्यथा त्याची कार्यक्षमता कमी होते. खोली थंड करण्यासाठी एसीचा वापर केला जातो (How To Clean Air Conditioner At Home). अनेकदा एसी लावल्यानंतरही व्यवस्थित कुलिंग होत नाही आणि दुर्गंधही येतो. सतत वापरल्यामुळे एसीची मशीन खराब होते. महागडे खर्च टाळण्यासाठी  तुम्ही घरच्याघरी एसीची सर्व्हिसींग करू शकता. यामुळे एसीतून चांगली हवा येईल आणि तुमचा खर्चही वाचेल. (How To Clean Air Conditioner Filters At Home)

रिमोटचं कोणतं बटन दाबावं? (AC Auto Cleaning Feature)

 रिमोटवर सेल्फ क्लिन किंवा आय क्लिन लिहिलेलं बट शोधा. हे बटन दाबल्यानंतर एसीची साफ-सफाई आपोआप होईल. जर तुमच्या घरातील एसीच्या रिमोटवर हे बटन नसेल तर एसी बंद करण्याआधी Cool मोड बंद करून फक्त पंखा सुरू ठेवा. ही प्रक्रिया कॉईलमध्ये जमा झालेलं पाणी पूर्णपणे सुकवते. ज्यामुळे बुरशी आणि बॅक्टरियाज तयार होत नाहीत.

आतला भाग सुकल्यामुळे एसी सुरू केल्यानंतर येणाऱ्या कुबट वासापासून सुटका होईल. जेव्हा कॉईल्स साफ आणि स्वच्छ असतात तेव्हा हीट एक्सचेंज उत्तमरित्या होते आणि खोली लवकर थंड होते. स्वच्छ मशीनवर कमी लोड येतो. ज्यामुळे कंप्रेसर कमी वीज वापरते आणि विजेचं बीलही कमी येतं.

मॅकेनिकचा खर्च वाचवण्याची स्मार्ट ट्रिक

नियमित स्वरूपात मॉईश्चर सुकवल्यास कॉईलल्सवर एक  जाड थर तयार होत नाही. ज्यामुळे मशीन आतून चांगले राहते. या छोट्या सवयीमुळे तुम्हाला वारंवार मॅकेनिकला बोलवावे लागणार नाही आणि एसीची लाईफ वाढेल.  हे बटन एसीच्या आतील मॉईश्चर शोषून घेते. पण बाहेरील फिल्टरची जाळी महिन्यातून एकदा हातानं धुणं खूप गरजेचं आहे.

एसीच्या वापराबाबत  या गोष्टी लक्षात ठेवा

एसी बंद केल्यानंतर कमीत कमी १० मिनिटांसाठी खोलीतला पंखा सुरू ठेवा जेणेकरून हवेचा प्रवाह व्यवस्थित राहील. एसी नेहमी २४ डिग्री सेल्सियस  ते २६ डिग्री सेल्सियसवरच सुरू ठेवा ही टेक्निक सुरक्षित आहे. जर तुम्ही स्वत: एसी स्वच्छ केल्यानंतरही कुलिंग न होण्याची समस्या येत असेल तर प्रोफेशनल सर्विसिंग करून घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy AC cleaning trick: Save money by pressing this remote button!

Web Summary : Clean your AC at home to improve cooling and save money. Use the self-clean button or run the fan after cooling mode to dry coils, preventing mold and odors. Regularly clean filters for optimal performance.
टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशलउन्हाळास्वच्छता टिप्सहोम अप्लायंस