आपल्यापैकी अनेकांच्या घरात चपाती रोज खाल्ली जाते. ती बनवण्यासाठी पोळपाट आणि लाटणं या दोघांचा वापर केला जातो.(Wooden rolling board cleaning) पूर्वीच्या काळी चपाती लाटण्यासाठी दगडाचे किंवा मार्बलचे पोळपाट-लाटणं वापरलं जायचं पण सध्या हे लोप पावले आहे. सध्या लाकडी पोळपाट लाटणं घरोघरी वापरलं जातं. क्वचितच कधीतरी त्याला सुट्टी मिळते.(How to clean rolling pin) अगदी रोजच्या रोज पोळ्या, पराठे, धिरडे, फुलके यांसारखे पदार्थ आपण त्यावर करतो आणि स्वच्छ करु ठेवतो. (Clean sticky wooden roti board)
अनेकदा पोळपाट- लाटणं स्वच्छ करुन देखील त्यावर चिकट थर जमा होतो, हिरवळ साचते, बुरशी लागते. ज्यामुळे ते पुन्हा वापरताना आपल्याला घाण वाटू लागते.(Home tips for cleaning kitchen tools) पोळपाटाच्या कडा अनेकदा चिकट असतात. त्यावर पीठाचा थर देखील साचलेला असतो. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपण काही सोप्या टिप्स फॉलो केल्यातर वर्षांनुवर्ष बदलण्याची गरजच नाही.
1. खरंतर लाकडी पोळपाट लाटण्याला लहान छिद्रे असतात. ज्यामध्ये पीठ, तेल आणि ओलावा अडकू शकतो. काही वेळाने हे कण कुजण्यास सुरुवात होते आणि बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढण्यास कारणीभूत ठरतात. कधीकधी लाटण्यावर काळे डाग पडतात. वास येतो किंवा खडबडीतपणा देखील वाढतो. म्हणून याची स्वच्छता राखणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
2. लाकडी पोळपाट किंवा लाटणं हे फक्त साबण आणि पाण्याने धुणे पुरेसे नाही. यासाठी कोमट पाण्याने धुवायला हवे. नंतर त्यावर लिंबू आणि मीठ शिंपडा. लाटण्यावर व्यवस्थित चोळून घ्या. यामुळे त्यावरील सर्व घाण निघून जाईल. लिंबूचे नैसर्गिक आम्ल बॅक्टेरिया मारते आणि दुर्गंधी दूर करते. नंतर पुन्हा कोमट पाण्याने धुवा.
लग्न ठरलं-चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो नाही? आठवडाभर प्या खास ड्रिंक, त्वचा होईल चमकदार- केस होतील शायनी
3. पोळपाट-लाटणं धुतल्यानंतर लगेच स्वच्छ सुती कापडाने पुसून सुकवा. लाकडातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. हवं असल्यास आपण काही वेळ उन्हात देखील ठेवू शकतो.
4. आपल्याला पोळपाट- लाटणं दीर्घकाळ टिकवायचा असेल तर स्वच्छ धुतल्यानंतर पूर्णपणे सुकू द्या. नंतर त्यावर खोबऱ्याचे तेल लावा. ज्यामुळे ते पॉलिश होईल. ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
5. आपल्या घरातील पोळपाट लाटण्याला खूप भेगा पडल्या असतील. काळी बुरशी वाढली असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर तो बदलायला हवा. अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. योग्य स्वच्छता आणि काळजी घेतल्यास ते बरेच वर्ष टिकते.
