Join us

वॉशिंग मशीन साफ करण्यासाठी ३ टिप्स; खर्च न करता-मशीन दिसेल नव्यासारखे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2024 16:34 IST

How to Clean a Washing Machine : मॅकेनिकला न बोलवता-पैसे खर्च न करता वॉशिंग मशिन होईल चकचकीत क्लिन

कपडे धुण्यासाठी बरेच जण वॉशिंग मशीनचा वापर करतात. मशीनमध्ये अधिक मेहनत न घेता, काही वेळात कपडे स्वच्छ होतात. मुख्य म्हणजे कपडे लवकर धुतलेही जातात, ज्यामुळे इतर कामे झटपट पूर्ण होतात. बऱ्याचदा काही लोकं वीजबिल जास्त येईल म्हणून रोजची कपडे हाताने धुतात, तर जाड कपडे आणि ब्लँकेट वॉशिंग मशीनमध्ये धुतात. तर काही लोकं नियमित वॉशिंग मशीनचा वापर करतात (Washing Machine).

सततच्या वापरामुळे वॉशिंग लवकर घाण होते. त्यात कपड्यांचे मळ आणि बरेच काही जमा होते. वॉशिंग मशिन अधिक काळ टिकावी यासाठी वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. काही जण वॉशिंग मशिन साफ करण्यासाठी मॅकेनिकला बोलावतात (Cleaning Tips). पण मॅकेनिकला बोलावून खर्च करण्यापेक्षा आपण घरातच वॉशिंग मशिन साफ करू शकता(How to Clean a Washing Machine).

वॉशिंग मशिन साफ करण्यासाठी टिप्स

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी, प्रथम त्याच्या ड्रममध्ये २ कप व्हिनेगर घाला. आता हाय टेम्प्रेचर मशीन चालू करा. त्यानंतर त्यात अर्धा कप बेकिंग सोडा घालून मशीन चालू करा. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा सहजपणे घाण, चिकट डाग आणि बॅक्टेरिया काढून टाकतात.

एकाच धुण्यात कॉटन कपड्यांचा रंग फिका पडला? धुताना पाण्यात मिसळा १ गोष्ट; कपडे दिसतील कायम नवे

लिंबाचा रस

वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरते. सर्व प्रथम, दोन लिंबू पिळून त्यांचा रस काढा आणि हा रस वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये घाला. नंतर सुती कापडाने वॉशिंग मशीन स्वच्छ करा. लिंबाचे आम्लीय गुणधर्म घाण काढून टाकण्यास मदत करतात.

जुना टूथब्रश आणि टूथपेस्ट

टूथब्रश आणि टूथपेस्टचा वापर करून आपण डिटर्जंट ट्रे किंवा गॅस्केट स्वच्छ करू शकता. यासाठी जुन्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावा. नंतर वॉशिंग मशीनचं इतर साहित्य घासून सुती कापडाने स्वच्छ करा.

फोडणीमुळे स्वयंपाक घराच्या भिंती मेणचट झाल्यात? ३ घरगुती टिप्स; पेंट न निघता- डाग होतील गायब

- मशीन आतून नसून, बाहेरून देखील स्वच्छ करा. शक्य असल्यास, मशीनला वरून कापड किंवा प्लास्टिकने झाकून ठेवा जेणेकरून त्यावर धूळ किंवा माती जमा होणार नाही.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल