प्रत्येकाच्या किचनमध्ये पिण्याचे पाणी स्टोअर करुन ठेवण्यासाठी विशिष्ट अशी भांडी असतात. पिण्याचे पाणी स्टोअर करण्यासाठी शक्यतो आपण स्टेनलेस स्टीलची टाकी आणि छोटासा जग (Don't use a washing gel or soap to clean a water storage vessel) वापरतो. या छोट्याशा स्टेनलेस स्टीलच्या टाकीची (How To Clean Water Storage) तसेच जगची वेळीच स्वच्छता देखील ठेवावी लागते. पिण्याचे पाणी आपण ज्या भांड्यात स्टोअर करून ठेवतो त्याची स्वच्छता देखील आपण तितकीच काळजीपूर्वक (How to Clean & Wash the Water Tank) करतो. पिण्याचे पाणी स्टोअर करून ठेवलेली भांडी आपण किमान आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घासतोच(How To Clean a Stainless Steel Water Storage Tank).
अशी पाणी स्टोअर करून ठेवण्यासाठीची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विड सोप किंवा भांडी घासण्याच्या साबणाचा वापर करतो. परंतु या लिक्विड सोप आणि साबणांत केमिकल्सयुक्त पदार्थ असतात. असे पदार्थ आपल्या पाण्यावाटे आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. यासाठीच आपले पिण्याचे पाणी स्टोअर करून ठेवलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण अशा केमिकल्सयुक्त लिक्विड आणि साबणाचा वापर करण्यापेक्षा घरातील एका खास सिक्रेट पिठाचा वापर करू शकतो. हे पीठ नेमके कोणते, आणि किचनमधील पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा ते पाहूयात.
पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी...
home_sattva या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ कशी करावी आणि त्यासाठी कोणत्या नैसर्गिक पिठाचा वापर करावा, याबद्दलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
किचनमधील पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी केमिकल्सयुक्त लिक्विड सोप आणि साबण हानिकारक ठरु शकते. यासाठी आपण पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी चक्क नाचणीच्या पिठाचा वापर करु शकता. नाचणीचे पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरात हमखास असते. या पिठाचा वापर करून आपण किचनमधील पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करु शकतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...
यासाठी आपल्याला फक्त चमचाभर नाचणीचे पीठ लागणार आहे. एका बाऊलमध्ये, चमचाभर नाचणीचे पीठ घेऊन त्यात चमचाभर पाणी घालून ते व्यवस्थित भिजवून त्याची मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करून घ्यावी. ही नाचणीची तयार पेस्ट स्पंज किंवा हातांच्या मदतीने भांड्यांना लावून भांडी स्वच्छ करुन घ्यावीत. त्यानंतर, पाण्याने भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत.
नाचणीचे पीठ एका प्रकारचे नैसर्गिक स्क्रबर आहे. नाचणीचे पीठ हे थोडेसे खरखरीत टेक्श्चर असणारे असते. त्यामुळे भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण नाचणीच्या पिठाचा वापर करु शकतो. किचनमधील पिण्याचे पाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी वापरली जाणारी स्टेनलेस स्टीलची टाकी किंवा जग नाचणीच्या पीठाने स्वच्छ केला जाऊ शकतो.