सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. आता नवरात्री म्हटलं की अनेक घरांमध्ये घटमाळ असते. म्हणजेच कलश मांडला जातो आणि प्रत्येक दिवशी त्या कलशावर एक फुलांची माळ सोडली जाते. आता प्रत्येकाकडेच रोजच्या रोज माळ करण्याएवढा वेळ नसतो. त्यामुळे हल्ली बरेच जण बाजारात विकत मिळणाऱ्या फुलांच्या माळा किंवा गजरे एकदाच विकत आणतात आणि त्यातली एक माळ रोज देवीला वाहतात. पण यामध्ये एक अडचण अशी येते की गजरे किंवा फुलांच्या माळा लवकर सुकतात (Home Hacks to Keep Garland or Gajra Fresh for Long). फुलं कोमेजून जातात. असं होऊ द्यायचं नसेल तर फुलांची माळ योग्य पद्धतीने कशी ठेवायची ते पाहा. असं केल्यास अगदी ५ ते ६ दिवस फुलांचे गजरे किंवा हार एकदम फ्रेश राहतील.(how to store flower mala for long?)
फुलांचे गजरे, हार जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी उपाय
फुलांचे गजरे किंवा हार अनेकजणी फ्रिजमध्ये ठेवताना ते आधी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवतात आणि नंतर ती पिशवी फ्रिजमध्ये ठेवतात. पण यामुळे पिशवीमध्ये जो ओलसरपणा येतो, त्यामुळे फुलं सडायला लागतात आणि खराब होतात.
काळी पडून घाण झालेली चहाची गाळणी १५ मिनिटांत होईल चकाचक, घ्या सोपा घरगुती उपाय
म्हणूनच फुलांचे गजरे कधीही पिशवीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवू नका. गजरे ठेवण्यासाठी स्टीलच्या डब्यांचा वापर करा. गजरे एखाद्या स्टीलच्या डब्यात भरा. ते भरत असतानाच खूप दाबून, जोर देऊन भरू नयेत. अगदी आल्हादपणे जेवढे गजरे त्यात मावतील, तेवढेच त्यामध्ये ठेवावे.
हा डबा फ्रिजमध्ये ठेवून द्या. गजरे बरेच दिवस अगदी फ्रेश राहतील शिवाय त्यांचा सुगंधही टिकून राहील.
दुसरा उपाय म्हणजे गजरे ठेवण्यासाठी एअरटाईट डब्याचा वापरही तुम्ही करू शकता. त्यासाठी एक एअरटाईट डबा घ्या.
चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी
त्या डब्यामध्ये खाली एखादा पेपर नॅपकिन टाका. आता त्यावर गजरे ठेवा. गजरे ठेवल्यानंतर त्यावरून पुन्हा एक पेपर नॅपकिन टाका. डब्याचं झाकण व्यवस्थित लावून तो फ्रिजमध्ये ठेवून द्या. गजरे राहतील फ्रेश.