lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ब्लाऊजचं फिटिंग बिघडलं, सैल होतंय? 5 मिनिटात करा दुरुस्ती, परफेक्ट फिटिंगची सोपी ट्रिक

ब्लाऊजचं फिटिंग बिघडलं, सैल होतंय? 5 मिनिटात करा दुरुस्ती, परफेक्ट फिटिंगची सोपी ट्रिक

Blouse Hacks: कधी कधी आपल्याला साडी नेसून झटपट तयार व्हायचं असतं आणि नेमकं तेव्हा कळतं की ब्लाऊज तर सैल होतंय (tricks for perfect fitting blouse).. अशा वेळी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 07:01 PM2022-04-29T19:01:07+5:302022-04-29T19:02:06+5:30

Blouse Hacks: कधी कधी आपल्याला साडी नेसून झटपट तयार व्हायचं असतं आणि नेमकं तेव्हा कळतं की ब्लाऊज तर सैल होतंय (tricks for perfect fitting blouse).. अशा वेळी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येतील..

Home Hacks: Simple tricks for perfect fitting of a loose blouse | ब्लाऊजचं फिटिंग बिघडलं, सैल होतंय? 5 मिनिटात करा दुरुस्ती, परफेक्ट फिटिंगची सोपी ट्रिक

ब्लाऊजचं फिटिंग बिघडलं, सैल होतंय? 5 मिनिटात करा दुरुस्ती, परफेक्ट फिटिंगची सोपी ट्रिक

Highlightsब्लाऊजची फिटिंग इतकी व्यवस्थित दिसेल की तुम्ही पिनअप करून ते ॲडजस्ट केलं आहे, हे सांगिल्याशिवाय कुणाला कळणारही नाही. 

खरंतर एखादं आपलंच जुनं ब्लाऊज आपल्याला सैल होतंय, ही बाब आपल्यासाठी खूप सुखावह असते. पण तयार होण्याची गडबड असताना जेव्हा ही अडचण समोर येऊन उभी ठाकते, तेव्हा मात्र आपण पार गोंधळून जातो. किंवा बरेचदा असंही होतं की आपल्याला कधीकधी आपल्या मैत्रिणीचं, बहिणीचं, आईचं ब्लाऊज घालायचं असतं. अशावेळी हे ब्लाऊज जर सैल (blouse is getting loose?) झालं असेल तर काय करावं, हे सुचत नाही. कारण ब्लाऊजला टिप मारण्याइतका वेळही आपल्याकडे नसतो. 

 

म्हणूनच सैल झालेलं ब्लाऊज ऐनवेळी कसं अगदी व्यवस्थित पिना लावून दुरुस्त करायचं, याविषयीची ही माहिती. यासंदर्भातला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या sundarii_handmade या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे. आपण करतो आहोत हे तात्पुरते उपाय आहेत. नंतर सवडीनुसार तुम्ही टेलरकडे जाऊन ब्लाऊज फिटिंगचं करून घ्याच, पण तोपर्यंत हा सोपा घरगुती उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. यामुळे ब्लाऊजची फिटिंग इतकी व्यवस्थित दिसेल की तुम्ही पिनअप करून ते ॲडजस्ट केलं आहे, हे सांगिल्याशिवाय कुणाला कळणारही नाही. 

 

ब्लाऊज सैलसर झालं असेल तर..
१. जर ब्लाऊज कंबरेत थोडंसं मोठं होत असेल तर समोरच्या बाजुने हुक लावण्याचं जे सगळ्यात खालचं काजं असतं, त्याच्या आणखी पुढे उजव्या हाताकडे एखादी सेप्टीपिन उभी लावा. जेणेकरून आपल्याला तिचा हुक लावण्यासाठी काजं म्हणून उपयोग करता येईल. ब्लाऊजचं हुक या पिनेमध्ये अडकवा. एका पिनेतच ब्लाऊज परफेक्ट फिट दिसू लागेल. 

२. जर ब्लाऊज खूप जास्त सैल असेल तर त्यासाठी तीन पिना वापरा. ब्लाऊजच्या दोन्ही बाजुला जिथे टिपा मारलेल्या असतात, त्या ठिकाणी तुमच्या मापानुसार एक- दोन बोटं सोडून पिना लावा. दोन्ही बाजूच्या पिना आणि ब्लाऊजची शिवण यांच्यातले अंतर सारखेच ठेवा. आता आधीच्या उपायात काजं म्हणून जशी पिन लावली तशीच एक पिन समोर, सगळ्यात खालच्या हुकसमोर लावा आणि हुक त्यात अडकवा.

 

३. ब्लाऊजचे शोल्डर उतरत असतील तर आधीच्या उपयात जसं आपण सगळ्यात खालच्या हुकसमोर पिन लावली तशीच आता सगळ्यात वरच्या हुकसमोर लावा. शोल्डर उतरत असल्यास खाली आणि वर दोन्ही बाजूने पिना लावणं गरजेचं आहे. 
४. खालील व्हिडिओमध्ये सांगितलेला उपायही तुम्ही करून बघू शकता. 

 

 

Web Title: Home Hacks: Simple tricks for perfect fitting of a loose blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.