बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं नविन भांडं घेतो. ते भांडं स्टीलचं असो किंवा मग काचेचं असो.. त्याला ते कोणत्या कंपनीचं आहे त्या ब्रॅण्डचं एखादं स्टिकर हमखास लावलेलं असतंच. अगदी पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप, ताटल्या, मोठे चमचे अशा जवळपास प्रत्येक नव्या भांड्यालाच स्टिकर्स असतात. ते स्टिकर्स जेव्हा आपण काढायला जातो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की ते पुर्ण निघत नाहीत. भांड्यांना अर्धवट चिटकून बसतात. मग असे अर्धवट चिटकलेले स्टिकर्स काढायला जास्त त्रास होतो. म्हणूनच आता आपण असे दोन उपाय पाहणार आहोत की जेणेकरून नव्या भांड्यांवरचे स्टिकर्स अगदी झटपट निघून जातील (how to remove stickers from new utensils?). शिवाय ते अर्धवट चिटकून न राहता व्यवस्थित पुर्णपणे निघून जातील.(best trick to remove sticker from new utensils)
नव्या भांड्यांवरचे स्टिकर्स कसे काढावे?
१. चिकटपट्टीचा उपयोग
नव्या भांड्यांवरचे स्टिकर्स काढण्यासाठी चिकटपट्टीचा वापर कसा करावा, याविषयी माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडिओ cook_withlakshmisuthar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
मुळा खाल्ल्यानंतर अपचन, गॅसेस होतात? ३ गोष्टी लक्षात ठेवा, मुळ्याचा अजिबात त्रास होणार नाही
यामध्ये असं सांगितलं आहे की एक आपल्या नेहमीच्या वापरात असणारी चिकटपट्टी घ्या. ती बोटाने थोडा दाब देऊन त्या स्टिकरवर पुर्णपणे चिटकवून टाका. थोडी स्टिकरच्या बाहेरही जाऊ द्या. त्यानंतर ती चिकटपट्टी काढून टाका. असं केल्यामुळे चिकटपट्टीसोबत भांड्यावरचं स्टिकरही झटकन निघून येईल.
२. भांडं गरम करा
नव्या भांड्यांवरचे स्टिकर्स काढून टाकण्याचा दुसरा एक साेपा उपाय म्हणजे ते भांडे थोडे गरम करा. ज्या बाजुला स्टिकर चिटकवलेले असेल त्याच्या विरुद्ध बाजुने भांडे गरम करावे.
कमी पैशांत घ्या ठसठशीत ठुशी कानातले, ७ सुंदर डिझाईन्स, करा पारंपरिक दागिन्यांचा थाट
गरम केलेले भांडे त्याला हात लावता येण्यासारखे थोडे कोमट झाले की मग स्टिकर ओढून काढून टाका. कुठेही चिटकून न बसता स्टिकर झटकन वेगळं होईल.