Join us  

होळीनंतर फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ३ टिप्स- डाग होतील स्वच्छ आणि घर पुन्हा चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2024 1:29 PM

Holi Celebration 2024: होळी झाल्यानंतर घरात वेगवेगळ्या ठिकाणी रंगांचे डाग पडतातच. ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा. (How to remove colour stains from wall and floor after holi)

ठळक मुद्दे या काही टिप्स पाहून घ्या आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले रंगांचे डाग झटपट स्वच्छ करा.

होळी खेळताना आपण तर रंगलेलो असतोच, पण जेव्हा आपण रंग खेळून घरात पुन्हा येतो, तेव्हा असं लक्षात येतं की आपल्यासोबतच आपलं घरदेखील अनेक ठिकाणी रंगलेलं आहे. घरात फरशीवर, भिंतीवर, दरवाज्यांवर, लाकडी फर्निचरवर बऱ्याच ठिकाणी रंग पडलेला दिसतो. त्यात पुन्हा घरात लहान मुलं असतील तर मग विचारायलाच नको. घरात पडलेले हे रंगांचे डाग काढायला मग पुढचे कित्येक दिवस पुरतात. म्हणूनच आता या काही टिप्स पाहून घ्या आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले रंगांचे डाग झटपट स्वच्छ करा. (How to remove colour stains after holi)

घरात पडलेले रंगांचे डाग कसे स्वच्छ करायचे?

 

घरात पडलेले रंगांचे डाग कसे स्वच्छ करायचे, याविषयीच्या काही टिप्स alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात जर फरशीवर कोरडा रंग सांडला असेल तर तो आधी झाडून घ्या आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. सोफ्यावर जर कोरडा रंग सांडला असेल तर तो मात्र वॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.

 

२. फरशीवर किंवा भिंतींवर ओला आणि पक्का रंग पडला असेल तर तो ओला असताना लगेच पुसून घ्या. जर रंग वाळलेला असेल तर मात्र त्या रंगाच्या डागावर सुरुवातीला बेकिंग सोडा घातलेलं गरम पाणी टाका. ते पाणी १० ते १५ मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर एखादा ओला कपडा घेऊन डाग पुसून टाका. 

डाळिंब पिकलेलं-गोड- रसरशीत आहे ना? २ सोप्या टिप्स, न चिरता ओळखा लालबूंद डाळिंब

३. लाकडी फर्निचर किंवा प्लास्टिकच्या वस्तूंवर ओला- पक्का रंग सांडला असेल तर तो काढून टाकण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमुव्हरचाही वापर करू शकता.

४. सोफ्यावर पडलेले ओल्या रंगाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर वापरून पाहा. डेटॉल लावूनही सोफ्यावरचे रंगांचे डाग निघू शकतात. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोळी 2024सुंदर गृहनियोजनहोम रेमेडी