lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

Viral Post Of High Food Prices At Mumbai Airport: बघा ही एवढी महागडी पाणपुरी नेमकी मिळते कोठे आणि का तिची किंमत एवढी जास्त आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 05:03 PM2024-05-02T17:03:44+5:302024-05-02T17:04:58+5:30

Viral Post Of High Food Prices At Mumbai Airport: बघा ही एवढी महागडी पाणपुरी नेमकी मिळते कोठे आणि का तिची किंमत एवढी जास्त आहे....

High food prices at mumbai airport, rs 333 for one plate panipuri having just 8 pieces, expensive golgappe at mumbai airport  | अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

Highlights३३३ रुपयांना एक प्लेट पाणीपुरी मिळते असं वाचल्यावर ही पाणीपुरी कदाचित परदेशातली असावी, असं वाटणं साहजिक आहे. पण तसं नाही.

पाणीपुरी हे भारतातलं एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड.. आता ते स्ट्रीटफूडच आहे. त्यामुळे तिची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडणारी असते, हे आपण आजवर बघत आलो आहोत. एवढंच काय काहीतरी चवदार खाण्याची इच्छा जेव्हा होते, तेव्हा जर आपल्याला काहीतरी स्वस्तात मस्त खायचं असेल तर आपण थेट जाऊन पाणीपुरीचा गाडा गाठतो. कारण पाणीपुरीएवढं स्वस्त आणि चवदार दुसरं काही नाही. पण हीच आपली स्वस्तातली पाणीपुरी एकदमच महागडी झाली आहे, आणि त्याचीच पोस्ट सध्या चर्चेत आहे. (Rs 333 for one plate panipuri)

 

३३३ रुपयांना एक प्लेट पाणीपुरी मिळते असं वाचल्यावर ही पाणीपुरी कदाचित परदेशातली असावी, असं वाटणं साहजिक आहे. पण तसं नाही.

कुलर खरेदी करण्यापुर्वी ५ गोष्टींची खात्री करून घ्या, खरेदी होईल परफेक्ट आणि उन्हाळा सुपरकूल... 

चक्क मुंबईविमानतळावरच्या एका स्टॉलमध्ये ही एवढी महागडी पाणीपुरी मिळते आहे. शुगर कॉस्मेटिक्सचे सहसंस्थापक कौशिक भारद्वाज यांनी स्वत: याविषयीची पोस्ट त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केली आहे. प्रवासानिमित्त ते मुंबईविमानतळावर गेले. तिथे त्यांना पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी असं स्ट्रीटफूड विकणारा एक स्टॉल दिसला. तिथे या पदार्थांची एक प्लेट तब्बल ३३३ रुपयांना मिळत होती आणि एका प्लेटमध्ये ८ पुऱ्या देण्यात येत होत्या. 

 

मुंबई विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी रिअल इस्टेट महाग आहे हे ऐकलं होतं, परंतू ते एवढं महाग आहे, याची कल्पना नव्हती, अशी बोलकी पोस्ट भारद्वाज यांनी शेअर केली आहे.

उष्माघातामुळे तुमच्यासमोर अचानक कोणाला भोवळ आली तर? ५ गोष्टी तातडीने करा, डॉक्टर सांगतात...

या पोस्टवर ग्राहकांच्याही खूप रंजक कमेंट आल्या आहेत. एकाने तर म्हटलं आहे या हिशेबाने जर महागाई वाढत गेली तर एखाद्या दिवशी पनीर चक्क सोनाराच्या दुकानात जाऊनच तोळा- तोळा घ्यावं लागेल...एवढी जास्त किंमत लावण्यासारखं त्या पाणीपुरीत असं काय आहे, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.

 

Web Title: High food prices at mumbai airport, rs 333 for one plate panipuri having just 8 pieces, expensive golgappe at mumbai airport 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.