Join us

अशी लपाछपी पाहिली नसेल! धिटूकली छोटी तिच्या कुत्र्याशी खेळतेय, पाहा इमोशनल खोडकर व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2022 20:37 IST

Social Viral Video कुत्रा एका व्यक्तीप्रमाणे आपल्यासोबत मैत्री करतो, असाच एक धिटुकली अन् कुत्र्याची मैत्री पाहा..

सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. त्यांचे सोज्वळ आणि गोंडस कृती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्रत्येकाला प्रिय असतो. तो आपल्या मालकांप्रती इमानदार असतो. यासह घरातील व्यक्तींसह प्रेमळ असतो. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक पाळीव कुत्रा एका चिमुकलीसह लपंडावचा खेळ खेळत आहे. त्यांचा हा खेळ आणि मैत्री पाहून नेटकरी अवाक झालेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या पाळीव कुत्र्याला, लपंडावाचा खेळ कसा खेळायचा हे समजावून सांगत आहे. त्यानंतर तिने समजावल्याप्रमाणे हा कुत्रा त्याच्यावर डाव असल्याने भिंतीवर हात आणि डोके ठेवून, तिला लपण्यासाठी वेळ देतो. काही वेळाने तिला शोधायलाही जातो. अगदी माणसांप्रमाणे या कुत्र्याला हा खेळ खेळताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा व्हायरल व्हिडीओ.

सध्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून, अनेकांनी या गोड जोडीला आणि त्यांच्यातील मैत्रीचे कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलमाध्यमेकुत्रा