Join us

इंग्रजी मंगलाष्टके कधी ऐकलीय का ? मराठमोळ्या लग्नात भटजींचा हटके स्वॅग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 14:51 IST

Viral Wedding Video महाराष्ट्रातील एका मराठमोळ्या जोडप्याच्या लग्नात इंग्रजी मंगलाष्टके, भटजी सोशल मीडियावर व्हायरल.

तुळशीच्या लग्नानंतर जणू लग्नाची लाट सुरू झाली आहे. तुमच्याही नात्यातील अथवा मित्र मंडळींमध्ये कोणाचा तरी लग्नाचा बार उडाला असेलच. सोशल मीडियावर देखील अनेकांचे लग्न सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. फक्त नवरा नवरी नव्हे तर त्यांचं कुटुंब, आणि मित्रमंडळी सगळे हटके गोष्ट करून व्हायरल होत आहेत. सध्या एका लग्नसोहळ्यातील भटजी बुवांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी गायलेली मंगलाष्टका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

लग्नात मुख्य लग्न लावून देणारा व्यक्ती म्हणजे भटजी, त्यांनी गायलेल्या मंगलाष्टकाने लग्न जुळून येते. सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका लग्नाची मंगलाष्टके सुरु आहेत. मंगलाष्टकामध्ये व्हायरल होण्यासारखं नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यात लग्न लावणारे गुरुजी चक्क इंग्रजीतून मंगलाष्टके गात आहेत. पहा व्हायरल व्हिडिओ..

हा व्हिडिओ जिग्नेश माळी या इंस्टाग्राम युजरने शेअर केला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील एका मराठमोळ्या जोडप्याच्या लग्नातील असल्याचे दिसत आहे. अनेकांनी या गुरुजींच्या इंग्रजीचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी निदान तुम्ही तरी आपल्या संस्कृतीचा मान ठेवा असे म्हणत टीका केली आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलमाध्यमे