Join us

पाहा मुंबईतली व्यायाम करवून घेणारी बस, महिलांनी व्यायामा करावा म्हणून बस थेट दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 13:22 IST

gym on wheels - now women can do gym for free, in a gym bus महिलांसाठी सरकारचा खास उपक्रम. आरोग्य चांगले राहावे म्हणून मोफत जीम, ती ही आगळीवेगळी.

तुम्ही बसने प्रवास तर केलाच असेल पण कधी बसमध्ये व्यायाम केला आहे का? महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. (gym on wheels - now women can do gym for free, in a gym bus)स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करणे, चालायला जाणे गरजेचे असते. जीमला जायचे म्हटले तर फार महाग पडते म्हणून जात नाहीत. मात्र अशा महिलांसाठी वांद्रामध्ये सुरू झालेला मनपाचा हा उपक्रम फारच फायदेशीर ठरत आहे.(gym on wheels - now women can do gym for free, in a gym bus)

समुद्रकिनारी चालायला येणाऱ्यांसाठी कार्टर रोड या परिसरात फिरती जीम हा उपक्रम सुरु झाला आहे. एक मोठी गुलाबी बस या परिसरात उभी असते. (gym on wheels - now women can do gym for free, in a gym bus)या बसमध्ये मीनी जीम तयार केलेली आहे. विविध प्रकारची साधने तसेच एक प्रशिक्षित जीम ट्रेनर आदी सुविधा या बसमध्ये आहेत. ३०० हून अधिक महिला या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. 

लोकमतशी संवाद साधताना या महिलांनी फिरत्या जीमचा त्यांना किती फायदा होतो याबद्दल सांगितले. ही जीम अगदी मोफत आहेत. तसेच आपल्या सोयीच्या वेळी तेथे जाता येते. जीम ट्रेनर असल्यामुळे योग्य मार्गदर्शनही महिलांना मिळते. सोपे व्यायाम ते हेवी वर्कआऊट  सगळंच या बसमध्ये करता येते. विविध बॅचमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. महिलांकडून या उकप्रमाला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्यम वर्गीय महिला या जीमचा पुरेपूर आनंद लुटत आहेत, असे जीम ट्रेनरने सांगितले.     

सध्या फक्त वांद्र्यामध्ये हा उपक्रम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेने सुरू केलेली ही बस सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत कार्टर रोडवर उभी असते. प्रत्येकीला येथे व्यायाम करण्यासाठी तासभराचा सलग वेळ आरामात मिळतो. या बसला 'जीम ऑन व्हिल्स' असे नाव संबोधले जाते.

या जीमध्ये कार्डीओसाठी ट्रेडमिल आहेत तसेच स्पिनिंग आहे. विविध अवयवांचे व्यायाम करण्यासाठी केबलक्रॉस आहे. वजन उचलण्यासाठी डम्बेल्स आहेत. वॉर्मअप ते कार्डीओ सगळं जीम ट्रेनर शिकवते. ही अशी फिरती व्यायामशाळा इतरही ठिकाणी सुरू करायला हवी. मोफत व्यायाम करायला तर मिळतोच शिवाय असे उपक्रम महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायद्याचे ठरतील. असे येथे व्यायामास येणाऱ्या महिलांचे सांगितले.

टॅग्स :मुंबईमहिलाव्यायामआरोग्यसोशल व्हायरल