lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > गुढीपाडव्याच्या पुजेची 'ही' तयारी करून ठेवा, झटपट गुढी उभारली जाईल- धावपळ होणार नाही

गुढीपाडव्याच्या पुजेची 'ही' तयारी करून ठेवा, झटपट गुढी उभारली जाईल- धावपळ होणार नाही

How To Do Preparation For Gudi Padva Pooja: गुढीपाडव्याची पूजा झटपट होण्यासाठी ही थोडी तयारी आदल्यादिवशीच करून ठेवा. ऐनवेळी धावपळ होणार नाही. (Gudhi padva 2024)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2024 05:03 PM2024-04-08T17:03:45+5:302024-04-08T17:04:34+5:30

How To Do Preparation For Gudi Padva Pooja: गुढीपाडव्याची पूजा झटपट होण्यासाठी ही थोडी तयारी आदल्यादिवशीच करून ठेवा. ऐनवेळी धावपळ होणार नाही. (Gudhi padva 2024)

Gudhi padva 2024, How to do preparation for gudi padva pooja, gudi padva pooja, gudi padva pooja 2024 | गुढीपाडव्याच्या पुजेची 'ही' तयारी करून ठेवा, झटपट गुढी उभारली जाईल- धावपळ होणार नाही

गुढीपाडव्याच्या पुजेची 'ही' तयारी करून ठेवा, झटपट गुढी उभारली जाईल- धावपळ होणार नाही

Highlightsयामुळे तुमचं काम सोपं होईल, झटपट होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी ऐनवेळी होणारी पळापळ टळेल.

वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे सध्या गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे जल्लोष, उत्साह दिसतो आहे. आता कोणताही सण म्हटलं की घरातल्या महिलांना दुपटीने काम. त्यामुळे थोडी धावपळ, ओढाताण होतेच. स्वयंपाक करताना, पूजा करताना वस्तू वेळेवर सापडल्या नाही तर आणखीनच पळापळ होते, चीडचीड वाढते (Gudhi padva 2024). हे सगळं टाळण्यासाठी गुढी पुजनाची थोडी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवा (How to do preparation for gudi padva pooja). यामुळे तुमचं काम सोपं होईल, झटपट होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी ऐनवेळी होणारी पळापळ टळेल.(Gudhi padva 2024)

 

गुढी पाडव्यासाठी काय तयारी करावी?

१. गुढी उभारायची म्हणजे तिच्यासाठी काठी, एखादी साडी किंवा ओढणी लागते. त्यामुळे काठी शोधून ठेवा. ती स्वच्छ धुवून पुसून घ्या. साडी- ओढणीदेखील शोधून ठेवा. शक्य झालं तर साडीच्या किंवा ओढणीच्या निऱ्या घालून त्या पिनअप करून ठेवा. म्हणजे दुसऱ्यादिवशी त्यासाठीचा वेळही वाचेल. काठीला ओढणी किंवा साडी ज्याने बांधणार आहात ती दोरीसुद्धा शोधून ठेवा.

गुढीपाडवा स्पेशल: पारंपरिक मराठी दागिन्यांची श्रीमंती, बघा महाराष्ट्राची ओळख सांगणारे १२ मराठमोळे दागिने

२. गुढीला जो कलश किंवा फुलपात्र लावणार आहात ते देखील स्वच्छ धुवून पुसून ठेवा. 

३. गुढीसाठी हार, वस्त्रमाळ, गाठी, फुलं, कैरी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आधीच आणून ठेवा. म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही. 

 

४. गुढी ज्या जागेवर उभारणार आहात, ती जागा आधी धुवून पुसून स्वच्छ करा. कोणत्या पाटावर मांडणार ते बघून ठेवा. तसेच गुढीखाली टाकण्याचे वस्त्रही शोधून ठेवा.

रोज आंघोळीसाठी साबणाऐवजी 'ही' खास पावडर वापरा- टॅनिंग होणारच नाही, त्वचा नेहमीच चमकेल 

५. कडुलिंबाची पाने धुवून, वाळवून ठेवा. म्हणजे ऐनवेळी त्याची चटकन ते वाटून त्याचा नैवेद्य करता येईल. 

६. गुढी उभारल्यानंतर तिची पूूजा केली जाते. त्या पुजेसाठी एक ताम्हण, निरांजन, तुपाचा दिवा, फुलवात, दोरवात, उदबत्ती, काडेपेटी, दूध, पाणी, साखर, पंचामृत असं सगळं एका ठिकाणी काढून ठेवा. यामुळे खूप धावपळ वाचेल.

 

Web Title: Gudhi padva 2024, How to do preparation for gudi padva pooja, gudi padva pooja, gudi padva pooja 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.