Join us

एवढा मोठा पिझ्झा कधी पाहिला आहे? पाहा व्हायरल फोटो, तोंडाला सुटेल पाणी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2022 14:36 IST

Grand Pizza Viral Video : आज आपण असा एक पिझ्झा पाहणार आहोत जो कदाचित तुम्ही स्वप्नातच पाहिला असेल.

ठळक मुद्देलाखो जणांनी हा व्हिड़िओ पाहिला असून हजारोंनी त्या व्हिडिओला लाइक केले आहे.इतका मोठा पिझ्झा पाहिल्यावर तो खायची इच्छा झाली नाही तरच नवल

भारतात भारतीय पदार्थांची तर विविधता आहेच पण पिझ्झासारख्या परदेशातील पदार्थांची पण विशेष क्रेझ आहे. खवय्ये असलेले भारतीय लोक विविध प्रकारचा आहार अतिशय आवडीने आणि चवीने खातात. गरमागरम चिजी पिझ्झा आपल्याला नुसता फोटोमध्ये दिसला तरी आपल्याला तो खाण्याची इच्छा होते. पिझ्झा, पास्ता, बर्गर असे जंक फूड म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण. लहान मुले तर अशा पदार्थांचे नाव काढले तरी खूश होतात. कधी जवळच्या एखाद्या फूड कोर्टमध्ये जाऊन तर कधी घरी ऑर्डर करुन पिझ्झा खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पनीर, चीज, कॉर्न, शिमला मिर्ची यांची वेगवेगळी टॉपिंग असलेला आणि नॉनव्हेजमध्येही बरेच पर्याय असलेला पिझ्झा सगळ्याच वयोगटात आवडीने खाल्ला जातो. आज आपण असा एक पिझ्झा पाहणार आहोत जो कदाचित तुम्ही स्वप्नातच पाहिला असेल (Grand Pizza Viral Video). 

(Image : Google)

सोशल मीडियावर पिझ्झाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पिझ्झा बेस तयार करण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग करण्यापर्यंत सगळे करत असल्याचे दिसते. सुरुवातीला तो मोठाच्या मोठा पिझ्झा बेस तयार करतो. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसने मस्त डिझाइन्स काढून त्याला सजवतो. मग ४ भागांत टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, चीज असे टॉपिंग घालून अतिशय आकर्षक आणि तोंडाला पाणी सुटेल असा पिझ्झा तयार करतो. भट्टीमध्ये हा पिझ्झा बेक करुन तो एकसारखे तुकडे करतो आणि सर्व्ह करतो. 

फूडी बाइट या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. तसेच हा पिझ्झा या व्यक्तीने कोणासाठी, कुठे बनवला हे समजले नसले तरी हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही पिझ्झा खाण्याची इच्छा नाही झाली तरच नवल. ३५ सेकंदांचा हा ग्रँड पिझ्झा तयार करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल असून त्याला कॅप्शन देताना इतना बडा पिझ्झा खाया है? असे कॅप्शन दिले आहे. लाखो जणांनी हा व्हिड़िओ पाहिला असून हजारोंनी त्या व्हिडिओला लाइक केले आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया