Lokmat Sakhi >Social Viral > वडील, भाऊ, नवऱ्याविषयी सांगताना जेनेलिया डिसुझा म्हणाली आपण स्वत:ला कमी लेखतो म्हणून पुरुष... 

वडील, भाऊ, नवऱ्याविषयी सांगताना जेनेलिया डिसुझा म्हणाली आपण स्वत:ला कमी लेखतो म्हणून पुरुष... 

Genelia D'souza Reveals About Her Father, Brother and Husband Ritesh Deshmukh: जेनेलिया डिसुझाने तिच्या वडिलांविषयी, भावाविषयी आणि नवरा रितेश देशमुखविषयी शेअर केलेली ही खास गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 20:14 IST2025-07-19T20:12:50+5:302025-07-19T20:14:03+5:30

Genelia D'souza Reveals About Her Father, Brother and Husband Ritesh Deshmukh: जेनेलिया डिसुझाने तिच्या वडिलांविषयी, भावाविषयी आणि नवरा रितेश देशमुखविषयी शेअर केलेली ही खास गोष्ट...

genelia d'souza reveals about her father, brother and husband Ritesh Deshmukh | वडील, भाऊ, नवऱ्याविषयी सांगताना जेनेलिया डिसुझा म्हणाली आपण स्वत:ला कमी लेखतो म्हणून पुरुष... 

वडील, भाऊ, नवऱ्याविषयी सांगताना जेनेलिया डिसुझा म्हणाली आपण स्वत:ला कमी लेखतो म्हणून पुरुष... 

Highlightsजेनेलिया म्हणते आपण जर आपल्या मनातून आपण स्त्री आहोत, पुरुषांपेक्षा कमी आहोत ही गोष्ट काढायला हवी. बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात. 

गोड, गोंडस चेहऱ्याची अभिनेत्री जेनेलिया डिसुझा सध्या तिच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोड चेहरा आणि त्यावरचं मोहक हास्य ही तिची ओळख. रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर तर दादा आणि वहिनी म्हणूनच हे दाम्पत्य त्यांच्या चाहत्यांमध्ये ओळखलं जातं. काही काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर आता जेनेलिया पुन्हा एकदा या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. जेनेलिया उत्तम फुटबॉलपटू असून तिच्या घरातल्या मोकळ्या वातावरणाविषयीही ती नेहमीच तिच्या मुलाखतींमधून माहिती देत असते. आता तिच्या अशाच एका मुलाखतीचा एक छोटासा भाग सोशल मीडियावर व्हायरल होेत असून त्यात तिने बहुतांश महिलांमध्ये असणाऱ्या एका गोष्टीवर अचूक बोट ठेवले आहे.(Genelia D'souza Reveals About Her Father, Brother and Husband Ritesh Deshmukh)

 

जेनेलिया डिसुझा म्हणते...

त्या मुलाखतीत जेनेलिया म्हणते की माझ्या आजुबाजुला मी माझ्या अशा कित्येक मैत्रिणी पाहाते ज्यांचे नवरे, भाऊ त्यांना हे आणून दे, माझ्यासाठी ते कर असे आदेश देत असतात आणि त्या महिलाही नवऱ्याच्या, भावाच्या सूचना अगदी निमूटपणे पाळत असतात.

सॅण्डविचचा बेत? ब्रेडला लावा भरपूर प्रोटीन्स देणारा 'हा' पदार्थ- चीज, मेयोनिजची गरजच नाही

मी एक- दोघींना त्याविषयी हटकलंही.. त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की ते थकले आहेत, दमले आहेत.. मला असं वाटतं की नवऱ्याने किंवा भावाने काही मागितलं आणि आपण ते त्यांना दिलं तर यात वावगं काहीच नाही. आपण नक्कीच तेवढी मदत करू शकतो. पण आपण ती मदत करत असताना समोरच्या व्यक्तीने आपल्याला गृहित धरणं, आपण केलेल्या मदतीसाठी थँक यू किंवा प्लिज हे शब्द न वापरणं हे खूप चुकीचं आहे. जेनेलिया म्हणते बहुतांश महिला स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी लेखतात आणि त्यातूनच त्यांना पुरुषांचं सगळं ऐकून घेण्याची, त्यांचे आदेश मानण्याची सवय लागते. आणि पुरुषांची वृत्ती वाढत जाते..

 

'हे' माझ्या आयुष्यातले ग्रेट पुरुष..

जेनेलिया म्हणते माझ्या घरी मात्र मला असा अनुभव कधीच आला नाही. स्त्री आणि पुरुष समान आहेत अशाच वातावरणात मी वाढले आणि माझा नवराही तसाच आहे.

कोण म्हणतं सोनचाफा कुंडीत वाढत नाही? ५ टिप्स- सोनचाफ्यानं डवरेल इटूकलं झाडं-गंधानं भरेल घर

माझ्या वडीलांनी मला आणि माझ्या भावाला कधीही वेगवेगळ्या पद्धतींनी वाढवलं नाही. माझ्या भावानेही मी मुलगी आहे म्हणून एखादी गोष्ट करायला मला अडवलं नाही. तेच माझ्या नवऱ्याचंही आहे. मला वाटतं आपण जर आपल्या मनातून आपण स्त्री आहोत, पुरुषांपेक्षा कमी आहोत ही गोष्ट काढायला हवी. बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात. 

 

Web Title: genelia d'souza reveals about her father, brother and husband Ritesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.